Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली! | IPL 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs KKR

Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

IPL 2021, CSK vs KKR Final : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने मोठी चूक केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील दुसऱ्या षटकात हेजलवूड गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरचा सोपा झेल सोडला. हा झेल चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच महागात पडला. त्यावेळी व्यंकटेश अय्यरने खातेही उघडले नव्हते. त्यानंतर त्याने जबदस्त फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर जोडीने पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. कोलकाताच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. 11 व्या षटकात मॅचला कलाटणी मिळाली. शार्दुल ठाकूरने संघाला पहिलं यश मिळवून दिले. व्यंकटेश अय्यरचा रविंद्र जाडेजाने अप्रतिम कॅच टिपला. अय्यरने 32 चेंडूत 5 चौकार 3 षटकाराच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. हा कॅचसह घेत जाडेजाने एका अर्थाने कॅप्टन कूल धोनीची चूकच भरुन काढली. आणि मॅच सीएसकेच्या बाजूनं झुकली.

व्यंकटेश अय्यरने त्यानंतर अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला फार काळ मैदानात टिकता आला नाही. या दोघांशिवाय अन्य एकाही फलंदाजाला मैदानात फटकेबाजी करता आला नाही आणि सामना चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूनं झुकला. सलामीवीराच्या अर्धशतकानंतर इयॉन मॉर्गन, नीतिश राणा, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, राहुल त्रिपाठी यांना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. तळाच्या फलंदाजीत लॉकी फर्ग्युसन 18 आणि शिवम मावी 20 धावा केल्या. परिणामी कोलकाता नाईट रायडर्सला निर्धारित 20 षटकात 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारता आली.

रविंद्र जाडेजाने व्यंकटेश अय्यरच्या महत्त्वपूर्ण कॅचशिवाय चार ओव्हरच्या कोट्यात 37 धावा खर्चून दोन विकेटही घेतल्या. यात शाकिब अल हसन आणि दिनेश कार्तिक यांच्या विकेट्सचा समावेश होता. जाडेजाशिवाय चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 तर जोश हेजलवूडला दोन आणि दीपक चाहर आणि ब्रावोला एक एक विकेट मिळाली.

loading image
go to top