esakal | राजधानीला ओव्हरटेक करत चेन्नई एक्स्प्रेसनं गाठलं फायनल जंक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

राजधानीला ओव्हरटेक करत चेन्नई एक्स्प्रेसनं गाठलं फायनल जंक्शन

राजधानीला ओव्हरटेक करत चेन्नई एक्स्प्रेसनं गाठलं फायनल जंक्शन

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, DCa vs CSK Qualifier 1 : दुबईच्या मैदानात अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नईने 4 विकेट्सने बाजी मारली. धोनीने खणखणीत चौकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ऋतूराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकानंतर सामना पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं झुकला. पण धोनी आणि मोईन अलीच्या फटकेबाजीनं अखेरच चेन्नईनं सामन्यात कमबॅक केले.

दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात खराब झाली. फाफ ड्युप्लेसिस पहिल्याच षटकात बोल्ड झाला. त्यानंतर रॉबिन उथप्पानं सलामीवीर ऋतूराज गायकवाडच्या साथीनं शतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. उथप्पा आणि ऋतूराज गायकवाड बाद झाल्यानंतर सामना पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं झुकला. चेन्नईकडून आश्चर्यकारकरित्या शार्दुल ठाकूरला बढती देण्यात आली. या सर्व गोष्टींवर धोनीने अखेरच्या षटकात पडदा टाकला. दिल्ली विरुद्धच्या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने नवव्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या क्वालिफाय लढत जिंकून फायनल गाठण्याची आणखी एक संधी आहे.

पृथ्वी शॉ 60 (34) आणि रिषभ पंतच्या 51(35) अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 172 धावा केल्या आहेत. हेटमायरनेही 24 चेंडूत 37 धावांची उपयुक्त खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. याशिवाय ब्रावो, मोईन अली आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. दुबईच्या अबुधाबी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. फिनिशिंग करत त्याने आपला निर्णय सार्थ ठरवला.

पाहा सामन्याचे अपडेट्स

धोनीने 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा करत संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

160-6 : टॉम कुरेनने मोईन अलीलाही धाडले माघारी, त्याने 12 चेंडूत उपयुक्त 16 धावा केल्या.

149-5 : ऋतूराज गायकवाड 50 चेंडूत 70 धावा करुन बाद, आवेश खानला मिळाली विकेट

119-4 : चेन्नईला धक्क्यावर धक्के, रायडू रन आउट होऊन परतला माघारी

117-3 : शार्दुल ठाकूरला टॉम कुरेननं खातेही उघडू दिले नाही

113-2 : टॉम कुरेननं उथप्पाच्या खेळीला लावला ब्रेक, त्याने 44 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली

रैनाच्या जागेवर संधी मिळालेल्या रॉबिन उथप्पानं संधीच सोन करुन दाखवलं, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात झळकावले अर्धशतक

3-1 : नोर्तजेनं पहिल्याच षटकात चेन्नईला दिला पहिला धक्का, फाफ ड्युप्लेसिस अवघ्या एका धावेवर झाला बोल्ड

163-5 : हेटमायरच्या रुपात ब्रावोनं दिल्ली कॅपिटल्सला दिला पाचवा धक्का, त्याने 24 चेंडूत 37 धावा केल्या

80-4 : जाडेजाला मोठं यश, पृथ्वी झेलबाद होऊन माघारी, त्याने 34 चेंडूत 60 धावांची खेळी केली

77-3 : मोईन अलीनं 10 धावांवर अक्षर पटेलला दाखवला तंबूचा रस्ता, सँटनरने घेतला झेल

50-2 : हेजलवूडच्या खात्यात आणखी एक विकेट, ऋतूराजने घेतला श्रेयस अय्यरचा 1 (8) कॅच

36-1 : दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हेजलवूडनं संघाल मिळवून दिलं पहिलं यश, धवन 7 धावा करुन माघारी

असे आहेत दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, टॉम कुरेन, आवेश खान, अर्निच नोर्तजे.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड.

धोनीने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

loading image
go to top