IPL 2021 DC vs SRH : पंत-अय्यरचा फिनिशिंग टच; दिल्लीनं घेतली चेन्नईची जागा

दिल्ली कॅपिटल्सने 9 पैकी 7 सामन्यातील विजयासह 14 गुण कमावले आहेत.
DC vs SRH
DC vs SRH

IPL 2021 : रसातळाला असलेल्या सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी मात देत दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ 11(8) आणि शिखर धवन 42 (37) या दोन विकेट गमावून दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी राखून विजय नोंदवला. श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला पंतने 21 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 35 धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्जला खाली खेचत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. 9 पैकी 7 विजय आणि 2 पराभव स्विकारुन दिल्लीच्या संगाने 14 गुण मिळवले आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अब्दुल समदच्या 28 धावा आणि राशिद खानने 22 धावांची खेळी केली. वॉर्नर शून्यावर माघारी फिरल्यानंतर सलामीवीर वृद्धिमान साहाने 18(17), केन विल्यमसन 18(26), मनिष पांड्ये 17 (16) आणि जेसन होल्डर 10 धावा केल्या. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी निर्धारित 20 षटकात सनरायझर्स हैदराबादला 9 बाद 134 धावांपर्यंतच मजल मारता आली.

72-2 : शिखर धवन 37 चेंडूत 42 धावांची खेळी करुन माघारी, राशिद खानने संघाला मिळवून दिले दुसरे यश

20-1 : पृथ्वी शॉ 11 धावांची भर घालून माघारी, खलील अहमदच्या गोलंदाजीवर विल्यमसनने घेतला सुरेख झेल

सनरायझर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या आहेत.

134-9 : अखेरच्या चेंडूवर संदीप शर्मा शून्यावर धावबाद झाला

133-8 : राशिद खान 19 चेंडूत 22 धावा करुन धावबाद झाला

115-7 : रबाडाने अब्दुल समदल पंतकरवी झेलबाद केले, त्याने हैदराबादकडून सर्वाधिक 28 धावा केल्या.

90-6 : जेसन होल्डरही माघारी, अक्षर पटेलला मिळाली विकेट

74-5 : केदार जाधव संधीच सोनं करण्यात पुन्हा अपयशी, नोर्तजेनं 3 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

61-4 : रबाडाला दुसरे यश, मनिष पांड्ये 17 धावा करुन माघारी

60-3 : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन अक्षर पटेलच्या फिरकीत अडकला, 26 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 18 धावा काढून तो तंबूत परतला.

29-2 : रबाडाने साहाला धाडले तंबूत, त्याने 17 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावांची खेळी केली

0-1 : डेविड वॉर्नरच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का, नॉर्तजेनं त्याला खातेही उघडू दिले नाही

दिल्ली कॅपिटल्सचा संघ

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार,) मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, नोर्तजे, आवेश खान.

सनरायझर्स हैदराबादचा संघ

डेविड वॉर्नर, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), मनिष पांड्ये, केन विल्यमसन (कर्णधार), केदार जाधव, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद.

केन विल्यमसनने टॉस जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com