esakal | IPL 2021: क्रिस मॉरिसची 1 विकेट पडली 1 कोटीला | Chris Morris
sakal

बोलून बातमी शोधा

Chris Morris

IPL 2021: क्रिस मॉरिसची 1 विकेट पडली 1 कोटीला

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. प्ले ऑफमधील संघ जवळपास पक्के झाले आहेत. सनरायझर्स हैदराबाद (SRH), पंजाब किंहग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एक संघ प्ले ऑफमधील चौथी जागा पक्की करेल.

जे संघ बाहेर पडले आहेत. त्यातील काही खेळाडूंकडून मोठी आशा होती. पण काही खेळाडूंनी फ्रेंचायझींचा विश्वास व्यर्थ ठरवला. राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या हंगामासाठी संघ निवड करताना मोठा दाव लागवला होता. आयपीएलच्या लिलावात त्यांना दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याला 16.25 कोटी रुपयात खरेदी केले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वोच्च बोली ठरली. पण या खेळाडूला आपला बोलबाला दाखवून देण्यात अपयश आले. त्याची एक विकेट जवळपास एक कोटीला पडली.

हेही वाचा: PLAY-OFF च्या आधीच KKRने दिली महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

क्रिस मॉरिसला 14 सामन्यांपैकी 11 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. दुखापतीमुळे त्याला प्रत्येक सामना खेळता आला नाही. 11 सामन्यात 25 च्या सरासरीसह त्याने 15 विकेट घेतल्या. याचा अर्थ त्याने घेतलेली एक विकेट जवळपास 1.08 कोटीला पडली. त्याने आपल्या गोलंदाजीत 9.17 इकोनॉमीनं धावा खर्च केल्या. 23 धावा खर्च करुन 4 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली. फलंदाजीतही तो काही फार चांगली कामगिरी करु शकला नाही. 13 च्या सरासरीने त्याने केवळ 67 धावाच केल्या. यातील 36 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली.

हेही वाचा: KKRच्या विजयानंतर 'मुंबई इंडियन्स' ट्रोल; भन्नाट मीम्स व्हायरल

राजस्थान रॉयल्सचा संघ मुंबई इंडियन्स आणि कोलकातासोबत शेवटपर्यंत प्ले ऑफच्या शर्यतीत होता. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना गमावल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यानंतर कोलकाताकडून त्यांना सपाटून मार खावा लागला. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात क्रिस मॉरिसला एकमेव विकेट मिळाली. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर त्याच्यावर ज्यावेळी फलंदाजीची वेळ आली त्यावेळीही तो फेल ठरला. वरुण चक्रवर्तीने त्याला खातेही उघडू दिले नाही. त्यामुळे राजस्थानने नेमकं त्याच्यासाठी एवढी रक्कम का मोजली? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पुन्हा पडू शकतो.

loading image
go to top