esakal | IPL 2021, KKR vs PBKS: शाहरुखच्या षटकारानं पंजाबचा भागंडा!
sakal

बोलून बातमी शोधा

KKR vs PBKS: शाहरुखच्या षटकारानं पंजाबचा भागंडा!

KKR vs PBKS: शाहरुखच्या षटकारानं पंजाबचा भागंडा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 KKR vs PBKS: कर्णधार लोकेश राहुलचे अर्धशतक आणि मोक्याच्या क्षणी शाहरुख खानने त्याला दिलेली साथ याच्या जोरावर पंजाबच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सला नमवलं. या विजयासह पंजाब किंग्जने स्पर्धेतील आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. अखेरच्या षटकात पंजाबने लोकेश राहुलची विकेट गमावली. त्यानंतर शहारुख खानने षटकार खेचत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शाहरुख खानने 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 22 धावांची मॅच विनिंग खेळी केली.

त्याने नाबाद प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून सलामीवीर व्यंकटेश अय्यरने 67(49) अर्धशतक झळकावले. याशिवाय राहुल त्रिपाठी 34 (26) आणि नितीश राणा 31(18) यांनी बहुमूल्य योगदान दिले.

कोलकाताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामी जोडीने दमदार सुरुवात केली. मयंक अग्रवला आणि लोकेश राहुलनं पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार खेचणाऱ्या मयांकला वरुण चक्रवर्तीने तंबूचा रस्ता दाखवला. निकोलस पूरन 12 आणि दीपक हुड्डा अवघ्या 3 धावा करुन परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या शाहरुख खानने कर्णधार लोकेश राहुला चांगली साथ दिली.

162-5 : लोकेश राहुल अखेरच्या षटकात झाला झेलबाद, व्यंकटेश अय्यरने त्याला 67 धावांवर केलं बाद

134-4 : शिवम मावीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना दीपक हुड्डा बाद, राहुल त्रिपाठीनं टिपला सोपा झेल

162-5 : अखेरच्या षटकात व्यंकटेश अय्यरने घेतली लोकेश राहुलची विकेट

129-3 : मार्करमच्या रुपात पंजाबला तिसरा धक्का, सुनील नरेनला मिळालं पहिलं यश

84-2 : वरुण चक्रवर्तीने पूरनला 12 धावांवर माघारी धाडत संघाला मिळवून दिली महत्त्वपूर्ण विकेट

70-1 वरुण चक्रवर्तीने संघाला मिळवून दिले पहिले यश, सेट झालेला मयंक अग्रवाल कर्णधार इयॉन मॉर्गनच्या हाती झेल देऊन तंबूत, त्याने 27 चेंडूत 40 धावांची खेळी केली

कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 165 धावा केल्या असून पंजाबसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

165-7 : शेवटच्या चेंडूवर अर्शदीपनं दिनेश कार्तिकला केलं बोल्ड

156-6 : मोहम्मद शमीनं टिम सेफर्टला केलं रन आउट

149-5 : नितीश राणाच्या रुपात अर्शदीपनं कोलकाता संघाला आणखी एक धक्का दिला, त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 31 धावांची उपयुक्त खेळी केली.

124-4 :केके आर कॅप्टन इयॉन मॉर्गन स्वस्तात माघारी, मोहम्मद शमीला मिळालं पहिलं यश

120-3 : कोलकाता नाईट रायडर्संला मोठा धक्का, बिश्नोईनं 67 धावांवर खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला धाडले माघारी

व्यंकटेश अय्यरनं 39 चेंडूत पूर्ण केलं अर्धशतक

90-2 : रवी बिश्नोईनं पंजाबला मिळवून दिले दुसरे यश, मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल त्रिपाठी 34 धावांवर झेलबाद

18-1 : अर्शदीप सिंगने सलामीची जोडी फोडली, शुभमन गिलला 7 धावांवर केलं बोल्ड

Punjab Kings (Playing XI): लोकेश राहुल (यष्टिरक्षक/ कर्णधार), मयांक अग्रवाल, एडन मार्करम, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुड्डा, फेबिन एलेन, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

Kolkata Knight Riders (Playing XI): शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), टिम सेफर्ट, सुनील नरेन, शिवम मावी, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती.

लोकेश राहुलने टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

loading image
go to top