IPL 2021 : युवा पोरानं विराटला गंडवलं; व्हिडिओ एकदा बघाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasidh krishna and virat kohli

IPL 2021 : युवा पोरानं विराटला गंडवलं; व्हिडिओ एकदा बघाच

रनमशिन विराट कोहली (Virat Kohli) सध्या खूपच दबावाखाली खेळताना दिसतोय. स्वत:च्या कामगिरीतील घसरलेला आलेख सुधारण्यासाठी त्याने भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर यंदाच्या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपदही सोडणार आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना विराट कोहलीसाठी खास असाच होता. पण या सामन्यात नावाला साजेसा खेळ करण्यात तो अपयशी ठरला.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. युवा देवदत्त पडिक्कलच्या साथीने विराट कोहलीने आरसीबीच्या डावाला सुरुवात केली. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर युवा प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत चौकार खेचत दमदार खेळी करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. पण पुढच्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने दिमाखदार कमबॅक केले. त्याने अप्रतिम इनस्विंगवर कोहलीला पायचित केले. 200 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कोहलीची विकेट प्रसिद्ध कृष्णासाठी अविस्मरणीय अशीच राहिल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळण्यासाठी कोहली मैदानात उतरला होता. विराटने एकाच फ्रेंचायझीकडून 200 सामने खेळण्याचा खास विक्रम आपल्या नावे केलाय. 2008 पासून विराट कोहली बंगळुरुकडून खेळत आहे. एकाच संघाकडून त्याच्याएवढे सामने कुणीही खेळलेले नाहीत. या खास सामन्यात विराट कोहलीला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे.

Web Title: Ipl 2021 Kkr Vs Rcb Virat Kohli Failed To Impress His 200th Ipl Match Prasidh Krishna Lbw The Rcb Captain Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..