IPL 2021 : KKR प्ले ऑफसाठी तयार; SRH ला दिला शह

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
KKR Team
KKR Team

IPL 2021 KKR vs SRH : शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 6 विकेटने पराभूत केले. शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर दिनेश कार्तिकने अखेरच्या टप्प्यात नावाला साजेसा खेळ करत खणखणीत चौकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. कोलकाताच्या खात्यावर आता 12 गुण जमा झाले असून प्ले ऑफच्या शर्यतीत ते इतर संघाच्या तुलनेत भक्कम दिसत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा अखेरचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यातील विजयासह ते प्ले ऑफचा मार्ग सुकर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवातही खराब झाली. दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत धमाकेदार फॉर्ममध्ये असलेला व्यंकटेश अय्यर स्वस्तात माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या राहुल त्रिपाठीनेही 7 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. एका बाजूला शुभमन गिल संयमी खेळ करत होता. नितीश राणाने त्याला जॉईन केले. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लयीत दिसणाऱ्या शुभमन गिल अर्धशतकानंतर बाद झाला. सिद्धार्थ कौलने त्याला 57 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. नितीश राणा 25 धावा करुन बाद झाल्यानंतर सामना पुन्हा हैदराबादकडून फिरतोय की का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण दिनेश कार्तिकने अनुभवाची झलक दाखवून देत संघाला विजय मिळवून दिला.

प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला अवघ्या 115 धावांवर रोखले होते. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या हैदराबादची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच षटकात धाव फलकावर अवघी 1 धाव असताना सलामीवीर वृद्धिमान साहा पायचित झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार केन विल्यमसन 26, अब्दुल समदच्या 25, प्रियम गर्गच्या 21 आणि जेसन रॉयनं केलेल्या 10 धावांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. परिणामी हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकात 8 बाद 115 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

106-4 नितीश राणाही 25 धावा करुन परतला, जेसन होल्डरने घेतली विकेट

93-3 : शुभमन गिल 57 धावांची खेळी करुन माघारी, सिद्धार्थ कौलला मिळाले यश

38-2 : राशिद खानने हैदराबादला मिळवून दिले दुसरे यश, राहुल त्रिपाठी तंबूत परतला

23-1 : व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकाताला पहिला धक्का, होल्डरला मिळाले यश

कोलकाता नाईट रायडर्ससमोर 116 धावांचे माफक आव्हान

103-8 : शिवम मावीला दुसरे यश, राशिद खान व्यंकटेश अय्यरच्या हाती झेल देऊन झाला बाद

95-7 : साउदीच्या खात्यात आणखी एक विकेट, अब्दुल समद 25 धावा करुन माघारी

80-6 : चक्रवर्तीच्या खात्यात आणखी एक यश, होल्डर 2 धावा करुन माघारी

70-5 : हैदराबादचा अर्धा संघ तंबूत, चक्रवर्तीने प्रियम गर्गला धाडले माघारी

51-4 : शाकिबच्या गोलंदाजीवर DK नं अभिषेक शर्माला केलं यष्टीचित, त्याने केवळ 6 धावा केल्या

38-3 : केन विल्यमसन धावबाद, 21 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने केल्या 26 धावा

16-2 : जेसन रॉयही 10 (13) स्वस्तात परतला, शिवम मावीला मिळालं यश

1-1 : पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर हैदराबादला धक्का, वृद्धिमान साहाला साउदीनं केलं पायचित

केन विल्यमसनने टॉस जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com