IPL 2021 MI vs CSK: चेन्नईचे शेर मुंबईच्या पलटनवर पडले भारी!

IPL 2021 MI vs CSK: चेन्नईचे शेर मुंबईच्या पलटनवर पडले भारी!
Summary

पाहा मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्याचे Highlights

IPL 2021 MI vs CSK Highlights: युएईमध्ये (UAE) रविवारपासून IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याला (2nd Phase) सुरूवात झाली. चेन्नईच्या (CSK) संघाने विजयी सलामी दिली. चेन्नईने मुंबई (Mumbai Indians) संघावर २० धावांनी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईने १५६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला २० षटकात केवळ १३६ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

पाहा या सामन्याचे Highlights-

सामना थोडक्यात...

नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि धोनी हे चौघे स्वस्तात बाद झाले होते. त्यामुळे चेन्नईची अवस्था ४ बाद २४ होती. त्यासोबतच अंबाती रायुडूदेखील दुखापतीमुळे मैदान सोडून गेला होता. पण, सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने ५८ चेंडूत नाबाद ८८ धावा करत संघाला १५६ धावा करून दिल्या.

१५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरूवातदेखील वाईटच झाली. त्यांनी ३ गडी गमावले. त्यानंतर डाव सांभाळण्याची त्यांना संधीच मिळाली नाही. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड हे सारे अनुभवी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. सौरभ तिवारीने एक बाजू पूर्णवेळ लावून धरली होती. पण त्याला मोक्याच्या क्षणी धावगती वाढवणं शक्य झालं नाही. त्याने ५ चौकारांसह ४० चेंडूत ५० धावा केल्या. बाकी कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com