esakal | IPL 2021, MI vs DC Dream11 Fantasy Tips : रोहितपेक्षा धवन ठरु शकतो भारी!
sakal

बोलून बातमी शोधा

MI vs DC

MI vs DC, Dream11 Fantasy Tips : रोहितपेक्षा धवन ठरु शकतो भारी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 46 व्या सामन्यात 5 वेळचा मुंबई इंडियन्सचा संघ (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने प्ले ऑफमध्ये आधीच आपली जागा निश्चित केली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला रुबाब कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सातत्याने पराभवाचा सामना करत ट्रॅकवरुन घसरलेल्या मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ज (PBKS) ला शह देत युएईच्या मैदानातील पराभवाची मालिका खंडीत केलीये.

गतविजेता मुंबई इंडियन्स संघावर प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्याचा दबाव निश्चित असेल. दिल्ली विरुद्ध मागील हंगामात चार वेळा या दोन्ही संघात लढत रंगली होती. यात मुंबई इंडियन्सची कामगिरी सर्वोत्तम राहिली. मागील चारही सामन्यात मुंबईने बाजी मारली असून याचा फायदा घेत आणखी एक विजय निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स प्रयत्नशील असेल. दुसरीकडे यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्ली मुंबई इंडियन्सवर भारी पडली होती. मात्र मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दबावात चांगला खेळ करण्याची क्षमता आहे.

MI vs DC, My Dream11 Team Prediction:

यष्टीरक्षक : क्विंटन डिकॉक, रिषभ पंत

फलंदाज: रोहित शर्मा (WC), शिखर धवन (C), सौरभ तिवारी, श्रेयस अय्यर

ऑलराउंडर: केरॉन पोलार्ड

गोलंदाज: जसप्रीत बुमराह, आवेश खान, राहुल चाहर, एनरिक नॉर्तजे

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स रेकॉर्ड

दोन्ही संघामध्ये आतापर्यंत एकूण 30 लढती झाल्या आहेत. यात दिल्ली कॅपिटल्सने 14 सामन्यात विजय नोंदवला असून 16 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 213 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. तर 218 ही मुंबई इंडियन्सने दिल्ली विरुद्ध केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. निच्चांकी धावसंख्येचा विचार केला मुंबई विरुद्ध खेळताना दिल्लीचा संघ 66 धावा ऑल आउट झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या नावे 92 ही निच्चांकी धावसंख्या आहे.

मुंबई इंडियन्स संभाव्य संघ

रोहित शर्मा (C), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, केरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, राहुल चाहर, नाथन कूल्टर-नाइल, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, स्टीव स्मिथ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (C & WK), शिमरोन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, आर. अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नोर्तजे, आवेश खान.

loading image
go to top