esakal | IPL 2021: अर्जुन तेंडुलकर एकही सामना न खेळताच भारतात परतणार, कारण... | Arjun Tendulkar
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun-Tendulkar-MI

मुंबईच्या संघाने अर्जुनला २० लाखांची बोली लावून घेतलं होतं विकत

IPL 2021: अर्जुन तेंडुलकर एकही सामना न खेळताच भारतात परतणार

sakal_logo
By
विराज भागवत

दुबई: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या युएईमध्ये आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला IPL 2021साठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत २० लाखांच्या मूळ बोलीवर विकत घेतले. त्यानंतर IPLच्या पहिल्या टप्प्यात त्याला मुंबईच्या संघात संधी मिळाली नव्हती. पण युएईला जाणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अर्जुनचा समावेश होता. त्यामुळे अर्जुनला एखादा सामना खेळण्याची संधी मिळते की काय अशी चर्चा होती. परंतु, आता अर्जुन मुंबईकडून एकही सामना न खेळताच मायदेशी परतणार असल्याची चिन्हं आहेत.

डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर याने मुंबईकडून सामना खेळलेला नाही. मात्र, सराव सत्रात त्याने अनेक बड्या फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. असे असले तरी त्याला एकही सामना न खेळता पुन्हा मायदेशी परतावे लागणार आहे. अर्जुनला दुखापत झाल्याने त्याच्या जागी बदली खेळाडूला संधी देण्यात आली आहे. अर्जुनच्या जागी सिमरनजीत सिंग याला IPL 2021साठी मुंबईच्या चमूत संधी मिळाली आहे. मध्यमगती वेगवान गोलंदाज सिमरनजीत सिंग हा संघासोबत नेट बॉलर म्हणून आला होता. IPLच्या नियमावलीनुसार त्याला अर्जुनचा बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे अशी माहिती मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून दिली.

loading image
go to top