MI vs DC : पोलार्डला आळस नडला! पाहा व्हिडिओ

मध्यफळीत लॉर्ड पोलार्डकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या 6 धावा करुन तंबूत परतला.
MI vs DC
MI vs DC

प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात नांगी टाकली. रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक स्वस्तात माघारी परतल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी जोडीने 30 धावांची माफक भागीदारी रचली. पण ही जोडी फुटल्यानंतर पुन्हा मुंबई इंडियन्सचा डाव कोलमडतानाचे चित्र पाहायला मिळाले.

मध्यफळीत लॉर्ड पोलार्डकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या 6 धावा करुन तंबूत परतला. नोर्तजेनं पोलार्डच्या दांड्या उडवल्या. 15 व्या षटकातील पहिल्या चेंडूत पोलार्डच्या स्वरुपात दिल्ली कॅपिटल्सला मोठं यश मिळाले. ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू पोलार्डने यष्टीवर ओढून घेतला. पोलार्डने खूपच हलक्या हाताने आणि अंगात जणू खूप आळस आल्यासारखा फटका खेळला. आणि चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीवर आदळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com