IPL 2021: Orange Cap च्या शर्यतीत आघाडीवर असलेले 5 फलंदाज

IPL 2021: Orange Cap च्या शर्यतीत आघाडीवर असलेले 5 फलंदाज जाणून घेऊयात ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील पाच आघाडीचे फलंदाज... IPL 2021 Orange Cap Race Shikhar Dhawan KL Rahul leading the List Most Runs ahead of UAE phase vjb 91
Shikhar-Dhawan-KL-Rahul-IPL
Shikhar-Dhawan-KL-Rahul-IPL
Updated on

जाणून घेऊयात ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील पाच आघाडीचे फलंदाज...

IPL 2021 in UAE: स्पर्धेचा १९ सप्टेंबरपासून दुसरा टप्पा रंगणार आहे. पहिल्या टप्पा भारतात रंगला होता. परंतु, स्पर्धा मध्यावर असताना काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आणि स्पर्धा तातडीने स्थगित करण्यात आली. मात्र, IPL 2021चा दुसरा टप्पा आता युएईमध्ये रंगणार आहे. युएईमध्ये गेल्या वर्षीचे संपूर्ण IPL रंगले होते. त्यात मुंबई इंडियन्स विजेता संघ ठरला होता. यंदा दुसऱ्या टप्प्यात कोण कशी फलंदाजी करतं याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहेच. पण त्याआधी जाणून घेऊया पहिल्या टप्प्यातील ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील फलंदाज...

१. शिखर धवन (Shikhar Dhawan) - दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

शिखर धवनला भारताच्या टी२० विश्वचषक संघात संधी मिळालेली नसली, तरी दिल्ली संघाचा सलामीवीर IPLच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल आहे. धवनने ८ सामन्यांमध्ये ३८० धावा केल्या आहेत. त्यातील २८३ धावा त्याने प्रथम फलंदाजी करताना केल्या असून तो एकदा नाबाद राहिला आहे. ९२ ही शिखर धवनची सर्वोच्च धावसंख्या आहे. धवनने ५४.२८च्या सरासरीने आणि १३४.२७च्या स्ट्राईक रेटने खेळत ३ अर्धशतकांसह या धावा केल्या आहेत. आतापर्यंतच त्याने ४३ चौकार आणि ८ षटकार लगावले आहेत.

२. लोकेश राहुल (KL Rahul) - पंजाब किंग्स (Punjab Kings)

पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. राहुलने ७ सामन्यात ३३१ धावा केल्या आहेत. त्यातील २४३ धावा त्याने प्रथम फलंदाजी करताना केल्या असून तो दोन वेळा नाबाद राहिला आहे. नाबाद ९१ ही त्याची पहिल्या टप्प्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आतापर्य़ंत त्याने ६६.२०च्या सरासरीने आणि १३६.२१च्या स्ट्राईक रेटने खेळत ४ अर्धशतकांसह या धावा कुटल्या आहेत. राहुलने पहिल्या टप्प्यात २७ चौकार आणि १६ षटकार खेचले आहेत.

३. फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) - चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज फाफ डु प्लेसिस पहिल्या टप्प्यात चेन्नईच्या संघातूनही दमदार फलंदाजी करता दिसला. डु प्लेसिसने ७ सामन्यात ३२० धावा केल्या आहेत. त्यातील २२० धावा त्याने प्रथम फलंदाजी केल्या असून तो २ वेळा नाबाद राहिला आहे. नाबाद ९५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ६४च्या सरासरीने आणि १४५.४५ च्या स्ट्राईक रेटने ४ अर्धशतकांसह या धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या टप्प्यात २९ चौकार आणि १३ षटकारांची बरसात केली आहे.

४. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) - दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

पृथ्वी शॉ हा ऑरेंज कॅपच्या शर्य़तीत Top 5मध्ये असणारा दिल्लीचा दुसरा फलंदाज आहे. पृथ्वीने ८ सामन्यांत ३ अर्धशतकांसह ३०८ धावा केल्या आहेत. त्यातील १८५ धावा त्याने प्रथम फलंदाजी करताना केल्या असून ८२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने ३८.५०च्या सरासरीने आणि १६६.४८च्या स्ट्राईक रेटने दमदार फलंदाजी केली आहे. पहिल्या टप्प्यात पृथ्वीने ३७ चौकार आणि १२ षटकारांची आतषबाजी केली आहे.

५. संजू सॅमसन (Sanju Samson) - राजस्थान रॉयल्स (Sanju Samson)

राजस्थानचा युवा कर्णधार संजू सॅमसन हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ७ सामन्यात एका धडाकेबाज शतकासह २७७ धावा केल्या आहेत. त्यातील १९० धावा प्रथम फलंदाजी करताना केल्या असून ११९ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ४६.१६च्या सरासरीने आणि १४५.७८च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात त्याच्या बॅटमधून २६ चौकार आणि ११ षटकार मारले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com