esakal | IPL 2021 Points Table: RCBचा विजय; राजस्थानचं टेन्शन वाढलं! | RCB vs RR
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan-Royals

राजस्थानचा संघ ११ सामन्यांनंतर सातव्या स्थानी

IPL 2021 Points Table: RCBचा विजय; राजस्थानचं टेन्शन वाढलं!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Points Table after RCB vs RR: स्पर्धेत बुधवारी बंगळुरू संघाने राजस्थानचा सहज पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना १८व्या षटकातच बंगळुरूच्या संघाने विजय मिळवला. राजस्थानकडून एव्हिन लुईसने दमदार अर्धशतक (५८) ठोकलं होतं. पण मॅक्सवेलच्या नाबाद अर्धशतकापुढे त्याचे प्रयत्न तोकडे पडले. या सामन्याच्या निकालानंतर राजस्थान सातव्या स्थानी गेलं असून संघाचं टेन्शन भलतंच वाढल्याचं दिसत आहे.

पाहा बंगळुरू वि. राजस्थान सामन्यानंतरचं Points Table-

राजस्थानचं टेन्शन वाढलं...

राजस्थान संघाचा पराभव झाल्याने ते आता सातव्या स्थानी फेकले गेले. राजस्थानचे ११ सामन्यांनंतर ४ विजयांसह ८ गुण आहेत. राजस्थानच्या संघाचे साखळी फेरीतील आता ३ सामने शिल्लक आहेत. चेन्नई, मुंबई आणि कोलकाता या तीन संघांशी राजस्थानचे पुढील तीन सामने होणार आहे. चेन्नईच्या संघाची कामगिरी दिवसेंदिवस उच्चप्रतीची होत आहे. १० सामन्यात ८ विजयांसह ते अव्वल आहेत. मुंबईचा संघ UAEमध्ये यंदाच्या हंगामात फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पण पंजाबविरूद्धच्या सामन्यात पोलार्ड आणि हार्दिक या दोघांना सूर गवसला होता. आणि, कोलकाताचा संघ प्रत्येक सामन्यात करो या मरोच्या त्वेषाने उतरत आहे. त्यामुळे राजस्थानला पुढील तीनही सामने जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील यात वादच नाही.

loading image
go to top