esakal | IPL 2021: पडिक्कल-कोहलीची फिफ्टी व्यर्थ, चेन्नई पुन्हा टॉपला
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: पडिक्कल-कोहलीची फिफ्टी व्यर्थ, चेन्नई पुन्हा टॉपला

IPL 2021: पडिक्कल-कोहलीची फिफ्टी व्यर्थ, चेन्नई पुन्हा टॉपला

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 RCB vs CSK 35th Match: ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसीस यांची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर अन्य खेळाडूंनी केलेल्या मोजक्या आणि उपयुक्त धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने दिलेले चॅलेंज सहज परतवून लावले. चेन्नई सुपर किंग्जने 6 गडी आणि 11 चेंडू राखत विजय नोंदवत पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. धावांचा पाठलाग करताना ऋतूराज गायकवाड 38, फाफ ड्युप्लेसीस 31 धावा केल्या. ही जोडी परतल्यानंतर मोईन अलीने 18 चेंडूत 23 धावांची खेळी केली.अंबाती रायडूनेही 22 चेंडूत 32 धावा केल्या. ही दोघे मोजक्या आणि उपयुक्त धावा करुन परतल्यानंतर रैना 10 चेंडूत नाबाद 17 आणि महेंद्र सिंह धोनीने 9 चेंडूत नाबाद 11 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. बंगळुरुच्या हर्षल पटेलने दोन तर मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

शारजहाच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना रंगला आहे. महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पॉवर-प्लेमध्येच अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. बंगळुरुच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी रचली. ड्वेन ब्रावोला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने कर्णधार विराट कोहलीला 53 धावांवर बाद केले.

विराट कोहलीची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या एबी डिव्हिलियर्सला मोठी फटकेबाजी करण्यात अपयश आले. 11 चेंडूत 12 धावांची खेळी करुन तो माघारी फिरला. त्याच्या पाठोपाठ देवदत्त पडिक्कलही 70 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानात तग धरुन मोठी फटकेबाजी करताना आली नाही. परिणामी बंगळुरुचा संघ निर्धारित 20 षटकात 6 बाद 156 धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नईकडून ब्रावोनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूरला दोन तर दीपक चाहरला एक बळी मिळवण्यात यश आले.

118-3 : हर्षल पटेलनं मोईन अलीला दाखवला तंबूचा रस्ता, मोईन अलीने आपल्या 18 चेंडूतील 23 धावांच्या खेळीत दोन उत्तुंग षटकार खेचले.

71-2 : फाफ ड्युप्लेसीसही 26 चेंडूत 31 धावा करुन माघारी, मॅक्सवेलन घेतली विकेट

71-1 : ऋतूराज गायकवाडच्या रुपात चहलने दिला चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का, त्याने 26 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या.

दमदार सुरुवात करुनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला 156 धावांपर्यंत मजल मारता आली

156-6 : हर्षल पटेलच्या रुपात ब्रावोला तिसरे यश

154-5 : ग्लेन मॅक्सवेलही स्वस्तात तंबूत, ब्रावोनं बंगळुरुला दिला पाचवा धक्का

150-4 : दीपक चाहरने टीम डेविडच्या रुपात संघाला मिळवून दिले आणखी एक यश

140-3 : शार्दूल ठाकूरने सलामीवीर देवदत्त पडिक्कलच्या रुपात संघाला आणखी एक यश मिळवून दिले. पडिक्कलने 70 धावांची दमदार खेळी केली.

140-2 : एबी डिव्हिलियर्सच्या रुपात बंगळुरुला दुसरा धक्का, शार्दूल ठाकूरला मिळाले यश

111-1 : अर्धशतकानंतर कोहलीनं सोडलं मैदान, ब्रावोनं फोडली सलामीची जोडी

देवदत्त पडिक्कलने 35 चेंडूत साजरे केलं अर्धशतक

पहिल्या विकेटसाठी विराट-देवदत्त यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण

विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिलीये

Royal Challengers Bangalore (Playing XI): विराट कोहली (कर्णधार) देवदत्त पडिक्कल, एस भरत (यष्टिरक्षक, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टीम डेविड, वानिडु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.

Chennai Super Kings (Playing XI): ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसीस, अंबाती रायडू, मोईन अली, सुरेश रैना, एम एस धोनी, रविचंद्रन अश्विन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड.

धोनीनं टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

loading image
go to top