esakal | IPL 2021, RCB vs RR मॅक्सवेलची फिफ्टी, RCB प्ले ऑफपासून एक पाउल दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Glenn Maxwell

IPL 2021 : मॅक्सवेलची फिफ्टी, RCB प्ले ऑफपासून एक पाउल दूर

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs RR : गोलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीनंतर मॅक्सवेल आणि एस भरतच्या फटकेबाजीनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 7 विकेट आणि 17 चेंडू राखून विजय नोंदवला. या विजयासह बंगळुरुनं प्ले ऑफच्या दिशेनं आणखी एक पाउल टाकले आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल मोजक्या धावा करुन परतल्यानंतर एस भरतने 44 धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या बाजूला मॅक्सवेल अर्धशतक झळकावून नाबाद राहिला. प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी बंगळुरुला आता उर्वरित तीन सामन्यातील एक सामना जिंकायचा आहे. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. राजस्थानकडून मुस्तफिझूरने दोन तर रियान परागने रन आउटच्या स्वरुपात एक विकेट घेतली.

पहिल्यांदा फलंदाजी करताना धमाकेदार सुरुवातीनंतर राजस्थान रॉयल्सचा संघ पटरीवरुन घसरला. अक्षर पटेल, शहाबाज अहमद आणि चहलच्या गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने सामन्यात दमदार कमबॅक केले. 11 षटकात 1 बाद 100 धावा असताना उर्वरित 9 षटकात राजस्थानचे फलंदाज फ्लॉप ठरले. निर्धारित 20 षटकात 9 बाद 149 धावांपर्यंतच मजल मारता आली.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात सामना रंगला आहे. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. राजस्थानच्या सलामी जोडीनं त्याचा हा निर्णय फोल ठरवत बंगळुरुच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. डावातील पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार खेचत लुईसने संघाच्या धाव फलकावर पन्नास धावा लावल्या. सेट झालेली ही जोडी फोडण्यात क्रिस्टनला यश आले. यशस्वी जयस्वाल 32 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर जॉर्ज गार्टन याने धोकादायक लुईसला बाद केले. त्याने 58 धावा केल्या. शहाबाज अहमने एकाच षटकात संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाला तंबूत धाडले. चहलने दोन तर अखेरच्या षटकात हर्षल पटेलनं तीन विकेट घेतल्या.

127-3 : एस भरतच्या रुपात बंगळुरुला तिसरा धक्का, त्याने 35 चेंडूत 44 धावांची दमदार खेळी केली

58-2 : रियान परागने विराट कोहलीला धावबाद करत संघाला मिळवून दिले मोठं यश, कोहली 22 चेंडूत 25 धावा करुन परतला

48-1 : मिस्तफिझुरने संघाला मिळवून दिले पहिले यश, देवदत्त पडिक्कल 22 धावा करुन माघारी

दमदार सुरुवातीनंतरही राजस्थानचा संघ अवघ्या 149 धावांत आटोपला

149-9 : चेतन सकारियाच्या रुपात हर्षल पटेलला तिसरे यश

146-8 : महागडा क्रिस मॉरिस स्वस्तात माघारी, हर्षल पटेलनं धाडले माघारी

146-7 : रियान परागच्या रुपात राजस्थानला आणखी एक धक्का, त्याने 9 धावांची खेळी केली

127-6 : लायम लिविंगस्टोनही चहलच्या जाळ्यात, राजस्थानला आणखी एक धक्का

117-5 : शहाबाज अहमच्या खात्यात आणखी एक विकेट, राहुल तेवतिया अवघ्या 2 धावांवर माघारी

113-4 : शहाबाज अहमदनं राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला 19 धावांवर बाद केले

113-3 : युजवेंद्र चहलने घेतली महिपाल लोमरोरची फिरकी, अवघ्या 3 धावा करुन तो तंबूत माघारी परतला.

100-2 : लुईसच्या रूपात राजस्थानला दुसरा धक्का, 37 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 58 धावांची खेळी करणाऱ्या सलामीवीराला जॉर्ज गॉर्टनने धाडले माघारी

77-1 : क्रिस्टननं राजस्थानची सलामी जोडी फोडली, यशस्वी जयस्वाल 22 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 32 धावा करुन माघारी

लुईस-यशस्वी जयस्वालनं पूर्ण केली अर्धशतकी भागीदारी

लुईस आणि यशस्वी जयस्वालनं केली राजस्थानच्या डावाची सुरुवात

Rajasthan Royals (Playing XI): एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, लायम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, मुस्तफिझुर रहमान.

Royal Challengers Bangalore (Playing XI): विराट कोहली (कर्णधार) , देवदत्त पडिक्कल, एस भारत (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल क्रिस्टन, जॉर्ज गेरॉटन, शहाबाझ अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून घेतली गोलंदाजी

loading image
go to top