esakal | MI vs SRH : मॅच आली, पण प्ले ऑफची संधी गेली| IPL 2021
sakal

बोलून बातमी शोधा

MI vs SRH : मॅच आली, पण प्ले ऑफची संधी गेली

MI vs SRH : मॅच आली, पण प्ले ऑफची संधी गेली

sakal_logo
By
सुशांत जाधव

साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला रोखून मुंबई इंडियन्सने स्पर्धेचा शेवट गोड केला. पण त्यांना प्ले ऑफ गाठता आली नाही. नेट रन रेटने सामना जिंकण्यासाठी त्यांना 171 धावांच्या फरकाने सामना जिंकायचा होता. याच इराद्याने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा बॅटिंग केली. इशान किशनच्या 84 धावांची खेळी आणि सूर्यकुमार यादवने केलेल्या 40 चेंडूतील 82 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 235 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतनर प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर हैदराबादला 65 धावांत रोखण्याचे आव्हान होते. ते त्यांना जमलं नाही. त्यामुळे सामना 42 धावांनी जिंकला असला तरी 14 गुणांसह त्यांना पाचव्या स्थानावर रहावे लागले.

धावांचा पाठलाग करताना कार्यवाहू कर्णधार मनिष पांड्येनं 41 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने निर्धारित 20 षटकात 8 बाद 193 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सकडून निशम नील आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर पियुष चावला आणि ट्रेंट बोल्टला 1-1 विकेट मिळाले.

पाहा अपडेट्स-

177-7 : बुमराहच्या खात्यात आणखी एक विकेट, राशिद खान 9 धावांची भर घालून माघारी परतला

166-6 : कुल्टर नीलने जेसन होल्डरला बोल्ट करवी केलं झेलबाद

156-5 : प्रियम गर्गने 21 चेंडूत 29 धावा करुन माघारी, बुमराहनं घेतली विकेट

100-4 : नीशमनं अब्दुल समदच्या रुपात घेतली सामन्यातील दुसरी विकेट

97-3 : मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या पियुष चावलाचे पहिले यश, त्याने मोहम्मद नबीला 3 धावांवर धाडले माघारी

79-2 : अभिषेक वर्माच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का, 16 चेंडूत 33 धावा करणाऱ्या सलामीवीराला नीशमनं धाडलं तंबूत

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 65 धावा करताना कोलकाता नाईट रायडर्सचे प्ले ऑफमधील स्थान झाले पक्के

64-1 : जेसन रॉयच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का, पण प्ले ऑफच्या आशा संपुष्टात

206-7 : कुल्टर नील अवघ्या 3 धावांची भर घालून माघारी, जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मोहम्मद नबीने टिपला झेल

184-6 : कृणाल पांड्या 7 चेंडूत 9 धावा करुन माघारी, राशिद खानच्या गोलंदाजीवर नबीनं घेतला झेल

151-5 : जीमी निशम आल्यापावली माघारी, अभिषेक वर्माला सलग दुसरे यश

151-4 पोलार्ड 13 धावा करुन माघारी, अभिषेक शर्माने आपल्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला दिला चौथा आणि मोठा धक्का!

सुर्यकुमार यादव-पोलार्ड मैदानात, दोघांकडून चौकार-षटकारांची बरसातीची अपेक्षा

इशान किशनच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पहिल्या 10 षटकात मुंबई इंडियन्सने 13 चे रनरेट कायम ठेवले आहे. तीन विकेट गमावल्यानंतरही मुंबई फ्रंटफूटवर आहे.

124-3 : धमाकेदार खेळी करणाऱ्या इशान किशनच्या खेळीला ब्रेक, 32 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने त्याने 84 धावा करुन तो माघारी फिरला, उमरान मलिकला मिळाले यश

113-2 : मोठा फटका मारण्याच्या नादात हार्दिक पांड्याने गमावली विकेट, तो 8 चेंडूत 10 धावा करुन परतला, जेसन होल्डरला मिळाले यश

80-1 : रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, 13 चेंडूत 18 धावा करुन रोहित शर्मा माघारी, राशिद खानला मिळाले यश

पहिल्या पाच षटकात मुंबईच्या सलामी जोडीनं रचली 78 धावांची भागीदारी

मुंबईच्या सलामी जोडीनं 22 चेंडूत मुंबईच्या धावफलकावर लावल्या 50 धावा

3 ओव्हरमध्ये 41 धावा इशान किशन 12 चेंडूत 34 धावा

नेटरनरेट जबऱ्या करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केलीये

असे आहेत दोन्ही संघ

Sunrisers Hyderabad (Playing XI): जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनिष पांड्ये (कर्णधार), प्रियम गर्ग, अब्दुल समद, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, राशिद खान, मोहम्मद नबी, उमरान मलिक, सिद्धार्थ कौल.

Mumbai Indians (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर नील, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.

रोहित शर्माने टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय

loading image
go to top