esakal | Video: ब्राव्होचा खतरनाक यॉर्कर अन् विल्यमसनचा उडाला गोंधळ | Bravo Yorker
sakal

बोलून बातमी शोधा

Video: ब्राव्होचा खतरनाक यॉर्कर अन् विल्यमसनचा उडाला गोंधळ

फॉर्ममध्ये असलेल्या विल्यमसनला ब्राव्होने केलं हैराण

Video: ब्राव्होचा खतरनाक यॉर्कर अन् विल्यमसनचा उडाला गोंधळ

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs SRH: चेन्नईच्या संघातील गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादच्या संघाला २० षटकात केवळ ७ बाद १३४ धावाच करता आल्या. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर चेन्नईकडून जोश हेजलवूडने २४ धावांत ३ बळी टिपले. संथी खेळपट्टीचा चेन्नईच्या गोलंदाजांनी योग्य वापर केला. त्यांना अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे मार्गदर्शन मिळाले. फॉर्मात असलेल्या कर्णधार विल्यमसनच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली.

हैदराबादचा सलामीवीर जेसन रॉय २ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन खेळण्यासाठी उतरला. त्याने शांतपणे खेळ सुरू केला आणि धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दोन चौकार लागवले. फॉर्मात असलेल्या विल्यमसनला रोखण्यासाठी धोनीने ब्राव्होला बोलावलं. ब्राव्होने अतिशय अचूक असा स्लो यॉर्कर चेंडू विल्यमसनला टाकला. तो चेंडू नक्की कसा गेला हे विल्यमसनलाही समजलं नाही. पण ब्राव्होने मात्र दिलेली कामगिरी फत्ते करत विल्यमसनला ११ धावांवर माघारी पाठवले.

या दोन गड्यांच्या बाद होण्याने हैदराबादची धावगती मर्यादित राहिली. हैदराबादचा तरणाबांड खेळाडू प्रियम गर्गही ७ धावा काढून माघारी परतला. वृद्धिमान साहाने मात्र एक बाजू लावून धरली. धावगती वाढवण्यासाठी त्याने जाडेजाच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या बॅटला लागून चेंडू उंच उडाला आणि धोनीने त्याला झेल टिपला. त्यानंतर अब्दुल समद (१८), जेसन होल्डर (५) यांनी निराशा केली. अखेर राशिद खानच्या नाबाद १७ धावांच्या जोरावर हैदराबादने १३४ धावांची मजल मारली.

loading image
go to top