esakal | IPL 2021, RCB vs KKR, : सामन्यात काय घडलं अन् RCB चं गणित कुठं बिघडलं!
sakal

बोलून बातमी शोधा

RCB vs KKR, : सामन्यात काय घडलं अन् RCB चं गणित कुठं बिघडलं!

RCB vs KKR, : सामन्यात काय घडलं अन् RCB चं गणित कुठं बिघडलं!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 Eliminator, RCB vs KKR : स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कमी पडला. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना पराभूत करत क्लालिफायर 2 खेळण्यासाठी आगेकूच केली. बंगळुरुच्या संघाने दिलेले आव्हान कोलकाताने अखेरच्या षटकात 4 गडी राखून पूर्ण केले. बंगळुरुच्या ताफ्यातील एबी डिव्हिलियर्स, मॅक्सवेल आणि श्रीकर भरत हे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यातील एकाने जरी मैदानात शेवटपर्यंत तग धरला असता तर सामन्याचा निकाल वेगला दिसला असता.


तत्पूर्वी सुनील नारायणने घेतलेल्या महत्वपूर्ण चार विकेट्स आणि लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट घेत त्याला दिलेली साथ याच्या जोरावर कोलकाताने बंगळुरुला निर्धारित 20 षटकात 7 बाद 138 धावांत रोखले. स्पर्धेतील आपला प्रवास कामय ठेवत क्लालिफायर 2 खेळण्यासाठी त्यांना 139 धावा करायच्या होत्या.

जी चूक बंगळुरुनं केली ती कोलकाता संघाने टाळली. सलामीच्या फलंदाजांनी उत्तम सुरुवात करुन दिल्यानंतर मध्यफळीतील राहुल त्रिपाठी वगळता अन्य फलंदाजांनी माफक पण मोलाच्या धावा करुन संघाच्या विजयातील अडथळा दूर केला.

पाहा सामन्याचे अपडेट्स

126-6 : मोक्याच्या क्षणी सिराजने दिनेश कार्तिकला भरतकरवी झेलबाद करत संघात रंगत निर्माण केली

125-5 : सुनील नरेनच्या रुपात कोलकाताला पाचवा धक्का, त्याने 15 चेंडूत 26 धावांची उपयुक्त खेळी केली. सिराजने त्याच्या खेळीला ब्रेक लावला

110-4 : नितीश राणाच्या रुपात कोलकाता संघाला आणखी एक धक्का, चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो 23 धावांवर झाला झेलबाद

79-3 : व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकाता संघाला तिसरा धक्का, हर्षल पटेलचे दुसरे यश

53-2 : राहुल त्रिपाठीच्या रुपात कोलकाता संघाला दुसरा धक्का, चहलने केलं पायचित

41-1 : स्फोटक फलंदाजी करणाऱ्या शुबमन गिल माघारी, हर्षल पटेलनं संघाला दिला मोठा दिलासा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित 20 षटकात 7 बाद 138 धावा केल्या

134-7 : डॅनियल क्रिस्टन धावबाद

126-6 : शहाबाज अहमदच्या रुपात फर्ग्युसनला दुसरे यश, त्याने संघाच्या धावसंख्येत 13 धावांची भर घातली

112-5 : सुनील नारायण याने मॅक्सवेलला ही केलं चालते. त्याने 18 चेंडूत 15 धावांची खेळी केली

102-4 : एबी डिव्हिलियर्सही बोल्ड होऊन माघारी, नरेनला तिसरे यश

88-3 : सुनील नरेनला मिळाले विराट यश, कोहली 33 चेंडूत 39 धावा करुन माघारी

69-2 : सुनील नरेन श्रीकर भरतला धाडले माघारी, त्याने 9 धावांची भर घातली

49-1 : देवदत्त पडिक्कलच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का, लॉकी फर्ग्युसनला मिळाले यश

बंगळुरुकडून विराट-पडिक्कल तर कोलकाताकडून शाकिबनं केली डावाला सुरुवात

असे आहेत दोन्ही संघ

Kolkata Knight Riders (Playing XI): शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणओा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकीब अल हसन, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

Royal Challengers Bangalore (Playing XI): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीखर भरत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शहाबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

विराट कोहलीने टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

loading image
go to top