esakal | IPL 2021, RCB vs SRH भुवीनं एबीला रोखलं अन् कोहलीसमोर पुन्हा विल्यमसन जिंकला!
sakal

बोलून बातमी शोधा

SRH vs RCB

RCB vs SRH भुवीनं एबीला रोखलं अन् कोहलीसमोर पुन्हा विल्यमसन जिंकला!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs SRH : स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादने किंग कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला रोखून दाखवलं. सलामीवीर देवदत्त पडिक्कलच्या 41 धावा आणि मॅक्सवेलच्या 25 चेंडूतील 40 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. अखेरच्या षटकात RCB ला 13 धावांची गरज होती. गार्टनने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत एबीला स्ट्राइक दिले. 4 चेंडूत 12 धावांची गरज असताना एबीनं तिसरा चेंडू निर्धाव खेळला. त्यानंतर षटकार खेचून त्याने सामन्यात पुन्हा रंगत आणली. पाचवा चेंडू पुन्हा निर्धाव टाकत भुवीनं कमबॅक केले. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना एबी डिव्हिलियर्सला केवळ एक धाव घेता आली. धावांचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला निर्धारित 20 षटकात 7 बाद 137 धावांपर्यंत मजल मारता आली.

अबुधाबीच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला होता. अखेरच्या षटकापर्यंत सामन्यात रंगत पाहायला मिळाली. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 141 धावा केल्या आहेत. सलामीवीर जेसन रॉयने 38 चेंडूत 44 धावा तर त्याला केन विल्यमसन याने 29 चेंडूत 31 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. पण त्यानंतर अन्य कोणत्याही फलंदाजांना नावाला साजेसा खेळ करता आला नाही. बंगळुरुकडून हर्षल पटेलनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

128-6 : जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर शाहबाजही माघारी. त्याने 9 चेंडूत 14 धावांची खेळी केली

109-5 : राशिद खानने घेतली देवदत्त पडिक्कलची विकेट, त्याने 41 धावांची खेळी केली

92-4 : केन विल्यमसनने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत मॅक्सवेलच्या तुफान फटेबाजीला लावला ब्रेक, ग्लेन मॅक्सवेलनं 25 चेंडूत 40 धावा केल्या

38-3 : जम्मूचा उमरान मलिकचं आयपीएलमधील पहिलं यश, श्रीकर भरतला 12 धावांवर धाडले माघारी

18-2 : बंगळुरुला आणखी एक धक्का, सिद्धार्थ कौलनं क्रिस्टनला धाडले माघारी

6-1 : भुवीनं पहिल्याच षटकात कोहलीला दाखवला तंबूचा रस्ता, 5 धावांवर तो पायचित झाला.

141-7 : हर्षल पटेलची तिसरी विकेट, जेनस रॉयच्या खेळीला लावला ब्रेक, त्याने 13 चेंडूत 16 धावांची खेळी केली.

124-6 : हर्षल पटेलच्या खात्यात आणखी एक विकेट, वृद्धिमान साहाला 10 धावांवर धाडले तंबूत

107-5 : चहलच्या गोलंदाजीवर आरसीबीचा यशस्वी रिव्ह्यू, अब्दुल समद अवघी एक धाव करुन झाला पायचित

107-4 : पंधराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रियम गर्गला माघारी धाडणाऱ्या क्रिस्टनने याच षटकातील शेवटच्या चेंडूवर जेसन रॉयल कॉट अँण्ड बोल्ड करत धाडले माघारी, रॉयने 38 चेंडूत 44 धावा केल्या.

105-3 : प्रियम गर्गच्या रुपात हैदराबादला तिसरा धक्का; संघाच्या धावसंख्येत 15 धावांची भर घालून तो क्रिस्टनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला

84-2 : जेसन-केन जोडी फुटली; हर्षल पटेलनं संघाला मिळवून दिले यश

जेसन-विल्यमसन जोडी जमली, दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत पूर्ण केली अर्धशतकी भागीदारी

14-1 : जेसन रॉयसोबत अभिषेक शर्मानं डावाला दमदार सुरुवात केली, पण फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने 10 चेंडूत 13 धावा करुन धरला तंबूचा रस्ता, गार्टनला मिळाले यश

असे आहेत दोन्ही संघ

Royal Challengers Bangalore (Playing XI): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल (यष्टीरक्षक), डॅनियल क्रिस्टन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, श्रीकर भरत, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

Sunrisers Hyderabad (Playing XI): जेसन रॉय, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसनस (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उमरान मलिक.

विराट कोहलीनं जिंकला टॉस, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

loading image
go to top