राहुलच्या संघात 7 कोटींच्या 'वाघा'च्या बदल्यात 1 कोटींचा 'छावा' | IPL 2022 Andrew Tye Replacement For Mark Wood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andrew Tye

राहुलच्या संघात 7 कोटींच्या 'वाघा'च्या बदल्यात 1 कोटींचा 'छावा'

लखनऊ सुपर जाएंट्सने टाटा आयपीएलसाठी दुखापतग्रस्त मार्क वूडच्या जागी ऑस्ट्रेलियन अँड्र्यू टायला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. मार्क वूड या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात कोपराला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला होता. मार्क वूडच्या (Mark Wood) जागी लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वाखालील लखनऊचा संघ कोणाला संघात घेणार याची चर्चा चांगलीच रंगली होती. यावर अखेर पडदा पडला आहे.

मार्क वूडसाठी लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants फ्रेंचायजींन मोठा डाव खेळला होता. आयपीएलच्या मेगा लिलावात 7 कोटी मोजून लखनऊने त्याला आपल्या संघात घेतलं. पण स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच संघाला मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे मार्क वूडवर स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली. त्याची जागा आता अँड्रू टाय (Andrew Tye) घेणार आहे.

हेही वाचा: IPL 2022 : धोनी श्रीमंत की रोहित? जाणून घ्या 10 कॅप्टन्सची कमाई

अँड्रयू टाय याचे आयपीएल कारकिर्दी लक्षवेधी राहिली आहे. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन संघाकडून 32 टी 20 सामनेही खेळले आहेत. यात त्याने 47 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील 27 सामन्यात त्याच्या खात्यात 40 विकेट जमा आहेत. तो 1 कोटी या मूळ किंमतीसह लखनऊचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल. लखनऊ सुपर जाएंट्स संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या रिंगणात उतरणार आहे. या स्पर्धेत नव्याने उतरणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीने ते स्पर्धेचा शुभारंभ करतील.

पदार्पणाच्या सामन्यात केली होती हॅट्ट्रिक कमाल

अँड्र्यू टाय आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये इतकी होती. तीच रक्कम लखनऊ त्याला या हंगामासाठी देणार आहे. अँड्र्यू टायने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात हवा केली होती. गुजरात लायन्सच्या जुन्या संघाशिवाय त्याने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचेही प्रतिनिधित्व केले आहे. टायने 2017 मध्ये गुजरातकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने हॅटट्रिकसह 5 विकेट घेतल्या होत्या.

Web Title: Ipl 2022 Andrew Tye Joins Lucknow Super Giants As A Replacement For Mark Wood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top