IPL 2022 Auction : नाव मोठं लक्षण खोटं; रैनाकडे धोनीनं फिरवली पाठ

Suresh Raina Unsold IPL 2022 Mega Auction
Suresh Raina Unsold IPL 2022 Mega AuctionSakal
Updated on

Suresh Raina Unsold IPL 2022 Mega Auction : 'मिस्टर आयपीएल' स्पेशलिस्ट सुरेश रैना दुसऱ्या फेरीतही अनसोल्ड राहिला. चेन्नई सुपर किंग्जनं (Channai Super Kings) त्याला मेगा लिलावापूर्वी रिलीज केले होते. पहिल्या टप्प्यात अनसोल्ड राहिल्यानंतर किमान दुसऱ्या फेरीत त्याला भाव मिळेल अशी अपेक्षा होती, पण दुसऱ्या फेरीत त्याला कोणीही किंमत द्यायला तयार झाले नाही. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरेश रैनावर (Suresh Raina) अशी वेळ ओढावली आहे.

Suresh Raina Unsold IPL 2022 Mega Auction
IPL Auction : टॉप 10 महागडे खेळाडू; MI पेक्षा RCB नं खेळला भारी डाव!

आयपीएलमध्ये 5 हजारहून अधिक धावा करणाऱ्या रैना दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. याआधी वैयक्तिक कारणास्तव त्याने युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलमधून माघार घेतली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या चिन्ना थालाची मूळ किंमत 2 कोटी होती. धोनीसोबतच रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. गत हंगामाप्रमाणे धोनी-रैना जोडी पुन्हा आयपीएलच्या मैदानात दिसेल, अशी आशा रैनाच्या चाहत्यांना होती.

Suresh Raina Unsold IPL 2022 Mega Auction
IPL Auction : टॉप 10 महागडे खेळाडू; MI पेक्षा RCB नं खेळला भारी डाव!

सुरेश रैनानं 204 आयपीएल सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. विराट कोहली (Virat Kohli) (6283), शिखर धवन (Shikhar Dhawan) (5784) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) (5611) ही तिघेच त्याच्या पुढे आहेत. सुरेश रैनाची आयपीएलमधी कामगिरी लक्षवेधी असली तरी गत हंगामात त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. त्याने 12 सामन्यात केवळ 160 धावा केल्या होत्या. तरीही त्याने आपली बेस प्राइज 2 कोटीच्या घरात ठेवून कुठतरी चुक केली असं दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com