CSK vs PBKS: सीएसकेच्या पदरी पराभवाची हॅट्ट्रिक; लिव्हिंगस्टोन ठरला किंग

Chennai Super Kings Lost 3rd match in Row
Chennai Super Kings Lost 3rd match in Row ESAKAL

चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पराभवाची मालिका तिसऱ्या सामन्यातही सुरूच राहिली. पंजाब किंग्जने चेन्नईचा 54 धावांनी पराभव करत आपला हंगामातील दुसरा विजय साजरा केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 180 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईचा डाव 18 षटकात 126 धावात आटोपला.

पंजाबच्या लिम लिव्हिंगस्टोनने दमदार कामगिरी करत फलंदाजीत 60 धावांचे तर गोलंदाजीत 2 विकेट घेऊन योगदान दिले. पंजाबकडून वैभव अरोरा, राहुल चाहरने चांगला मारा केला. राहुल चाहरने 3 तर अरोराने 2 विकेट घेतल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 57 धावांची खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी तो बाद झाला.

पंजाबने 181 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची पॉवर प्लेमध्येच 4 बाद 23 अशी अवस्था करून टाकली. पंजाबच्या वैभव अरोराने नवीन चेंडूवर भेदक मारा करत रॉबिन उथप्पा (13) आणि मोईन अलीची (0) शिकार केली. तर रबाडाने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर रविंद्र जडेजाला अर्शदीप सिंगने भोपळाही फोडू दिला नाही. पाठोपाठ आडेन स्मिथने सीएसकेचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला (13) देखील बाद केल्याने सीएसकेची अवस्था 5 बाद 36 अशी झाली.

मात्र यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे यांनी डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. धोनीने एकेरी दुहेरीवर भर दिली तर शिवम दुबेने पंजाबच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. त्याने 26 चेंडूत अर्धशतक ठोकले. पमात्र त्यानंतर लिव्हिंगस्टोनने बॅटिंगप्रमाणाचे गोलंदाजीतही मोठी भुमिका निभावली. त्याने 30 चेंडूत 57 धावा करणाऱ्या शिवम दुबेला बाद केले. त्यानंतर सीसएकेच्या फलंदाजीला गळतीच लागली. पुढच्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने ब्रोव्होला बाद केले.

यानंतर धोनीने आपला गिअर बदलला मात्र समोरून विकेट पडलण्याचा सिलसिला सुरूच राहिला. प्रेटोरियस ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर 28 चेंडूत 23 धावा करणारा धोनी देखील बाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर सीएसकेची उरली सुरली आशा देखील संपुष्टात आली.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्या दोन षटकात पंजाबच्या दोन विकेट घेत त्यांची अवस्था 2 बाद 14 धावा केली. मयांक अग्रवाल 4 तर राजपक्षे 9 धावा करून बाद झाले. या खराब सुरुवातीनंतर शिखर धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने पंजाबचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची आक्रमक भागीदारी रचली. लिव्हिंगस्टोनने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत पंजाबला 10 व्या षटकाच्या आतच शंभरी पार करून दिली.

मात्र त्यानंतर ब्राव्होने ही जमलेली जोडी फोडली. त्याने शिखर धवनला (33) बाद केले. त्यानंतर रविंद्र जडेजाने लिव्हिंगस्टोनची आक्रमक 60 धावांची खेळी संपवत पंजाबला चौथा धक्का दिला. यानंतर मात्र पंजाबचा डाव घसरला. जितेश शर्माने (26) काही आक्रमक फटके मारले खरे मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबचा हार्ड हिटर शाहरूख खानला (6) देखील एकही चेंडू सीमापार धाडता आला नाही. अखेर चेन्नईने पंजाबला 20 षटकात 8 बाद 180 धावांमध्ये रोखले. चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि प्रेटोरियसने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com