VIDEO : CSK vs KKR सामन्यात काय काय घडलं, पाहा Highlights

IPL 2022 Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders
IPL 2022 Chennai Super Kings vs Kolkata Knight RidersSakal
Updated on

मुंबई : आयपीएल भारतात परतली आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला सामना वानखेडेच्या मैदानात पार पडला. या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सन गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 6 विकेट्सनी पराभूत केले. दोन्ही संघाच्या नव्या कर्णधारांचा पहिलाच सामना होता. सीएसकेचे नेतृत्व करणाऱ्या रविंद्र जडेजावर केकेआरचा नवा भिडू श्रेयस अय्यर भारी पडला. नजर टाकूयात सामन्याचे अपडेट्स आणि हायलाइट्सवर... (IPL 2022 Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Match Score Update)

123-4 : ब्रावोला तिसरं यश, सॅम बिलिंग्स 25 धावांची भर घालून तंबूत

87-3 : सँटनरनं अजिंक्यच्या 44 (34) खेळीला लावला ब्रेक, रविंद्र जडेजानं घेतला सुरेख झेल.

76-2 : डिजे ब्रावोच्या खात्यात आणखी एक विकेट, नितेश राणा 17 चेंडूत 22 धावा करुन रायडूच्या हाती झेल देऊन परतला

43-1 : कोलकाताच्या संघाला पहिला धक्का, सलामीवीर व्यंकटेश अय्यर 16 चेंडूत 16 धावा करुन तंबूत, ब्रावोनं मिळवलं यश

अजिंक्य रहाणेनं व्यंकटेश अय्यरच्या साथीनं केली कोलकाताच्या डावाला सुरुवात

कोलकाता संघासमोर 132 धावांचं लक्ष्य

धोनीच्या अर्धशतकासह 50 (38) रविंद्र जडेजाने केलेल्या 28 चेंडूतील 26 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात केल्या 5 बाद 131 धावा

धोनीची फटकेबाजी, रविंद्र जडेजासोबत 50 चेंडूत पूर्ण केली अर्धशतकी भागीदारी

61-5 : शिवम दुबेच्या रुपात चेन्नईने गमावली आणखी एक विकेट, आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर सुनील नरेननं टिपला झेल

52-4 : ताळमेळाची कमी, रन आउट होत अंबाती रायडूनं वाढवली चेन्नईची चिंता, तो 15 धावा करुन बाद झाला

49-3 : वरुण चक्रवर्तीनंही दाखवली फिरकीतील जादू, चेन्नईच्या डावाला आकार देणाऱ्या उथप्पाला चकवा, जॅक्सनने केल यष्टीचित

28-2 : उमेश यादवचा भेदक मारा, ड्वेन कॉन्वेच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जला दिला दुसरा धक्का

2-1 : ऋतूराज गायकवाडच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का, उमेश यादवनं काढली विकेट

ms

कोलकाताने नाणेफेक जिंकली, श्रेयस अय्यरचा गोलंदाजीचा निर्णय

केकेआर यंदाच्या हंगामात नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com