VIDEO : लिविंगस्टोनचा धमाका ; 60 पैकी 50 धावा चौकार-षटकारानं

IPL CSK vs PBKS
IPL CSK vs PBKSSakal

IPL 2022, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या लढतीत पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पहिल्यांदा बॅटिंग करताना कर्णधार मयांक अग्रवालच्या रुपात संघाला अवघ्या 4 धावांवर पहिला धक्का बसला त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला भानुका राजपक्षा देखील 9 धावांवर रन आउट झाला. त्यानंतर धवन आणि लायम लिविंगस्टोन (Liam Livingstone) जोडीनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची खेळी केली.

गब्बर 24 धावांत 33 धावा करुन बाद झाला. दुसऱ्या बाजूला लिविंगस्टोननं आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतक साकारत डावाला आकार दिला. त्याने 32 चेंडूत 60 धावा कुटल्या. यात त्याने 5 चौकार आणि 6 षटकारांसह 50 धावा या बाउंड्रीच्या स्वरुपातच काढल्या. संघाच्या डावातील पाचव्या षटकात लिविंगस्टोन याने चेन्नईचा गोलंदाज मुकेश चौधरीच्या (Mukesh Choudhary) याचा खरपूस समाचार घेतला. 24 धावा त्याने या षटकात ठोकल्या. मुकेशने दोन वाइड चेंडूसह या षटकात 26 धावा खर्च केल्या. चेन्नईकडून हे षटक चांगलेच महागडे पडले.

IPL CSK vs PBKS
धोनी अभी जिंदा है! पाहा रन आऊटचा भन्नाट VIDEO

लिविंगस्टोन याने चौधरीला पहिल्याच चेंडूवर जो षटकार खेचला तो स्टेडियममधील स्टँडमध्ये जाऊन पडल्याचे पाहायला मिळाले. त्याने मारलेला हा चेंडू 108 मीटर एवढ्या अंतरावर जाऊन पडला. पंजाब किंग्जचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा सामना असून लिविंगस्टोनच्या भात्यातून निघालेला हा दुसरा लांब अंतर कापलेला षटकार आहे. याआधी त्याने 105 मीटर लांब षटकार खेचला होता. यंदाच्या हंगामातील हा सर्वात लांब मारलेला षटकार ठरलाय. इंग्लंडच्या जोस बटलरने 101 मीटर तर इशान किशनने 98 मीटर लांब सिक्सर याआधी मारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com