IPL 2022 : अन् डेव्हिड वॉर्नर मैदानात 'श्रीवल्ली'वर मैदानातच थिरकला; म्हणे फरमाईश होती...

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या डोक्यातुन पुष्पा चित्रपट काय जात नाही.
David Warner Viral Video IPL 2022
David Warner Viral Video IPL 2022 SAKAL

David Warner Viral Video IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या डोक्यातुन पुष्पा चित्रपट काय जात नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यावर तो पुन्हा एकदा डान्स करताना दिसला. विशेष म्हणजे वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना वॉर्नरने मजेदार कॅप्शन लिहिले आहे. तुमचे विचार काय आहेत? चाहत्यांच्या मागणीवर... लक्षात घेण्यासारखे आहे की चाहत्यांना हा व्हिडिओ किती आवडला आहे. वॉर्नर याआधीही अनेकदा या गाण्यावर डान्स करताना दिसला आहे.

वॉर्नरची शानदार खेळी

कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 45 चेंडूत 61 धावा केल्या. यादरम्यान त्यांनी 6 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र असे असूनही वॉर्नर बाद झाल्यावर तो खूपच निराश दिसत होता. मुंबईच्या ब्रोबोन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४४ धावांनी पराभव केला. दिल्लीने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 बाद 215 धावा केल्या होत्या. त्यानंतर केकेआरचा संघ 19.4 षटकांत 171 धावांत गारद पडला. दिल्लीकडून सगळ्यांत जास्त कुलदीप यादवने 4 बळी घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com