VIDEO | DC vs RCB : बेंगलोरने दिल्ली केली सर; पाहा Highlights

IPL 2022 Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore
IPL 2022 Delhi Capitals vs Royal Challengers BangaloreESAKAL

आरसीबीने दिल्लीचा केला 16 धावांनी पराभव; पाहा हायलाईट्स

156-7 : 9 चेंडूत 17 धावा करणाऱ्या शार्दुल ठाकूरने अक्षरची सोडली साथ 

142-6 : पंत बाद दिल्ली अडचणीत

115-5 : हेजलवूडने दिल्लीला दिला दुसरा धक्का, ललित यादव 1 धाव करून बाद

112-4 : दिल्लीला पाठोपाठ दोन धक्के

दिल्लीच्या 112 धावा झाल्या असताना मिशेल मार्श धावबाद झाला. त्यानंतर जॉश हजलवूडने रोव्हमन पॉवेलला भोपळाही न फोडता माघारी धाडले.

94-2 : हसरंगाने केली मोठी शिकार

आरसीबीचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 66 धावांची आक्रमक खेळी केली.

50-1 : दिल्लीचा धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ 13 धावा करून बाद 

दिनेश कार्तिक आणि शाहबाजची सहाव्या विकेटसाठी नाबाद 97 धावांची भागीदारी. आरसीबीच्या 20 षटकात 5 बाद 189 धावा 

दिनेश कार्तिकचे दमदार अर्धशतक

ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने आरसीबीच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 24 चेंडूत अर्धशतक ठोकत आरसीबीला 150 पार पोहचवले.

92-5 : ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळी कुलदीप यादवने संपवली

75-4 : सुयश प्रभुदेसाई 6 धावा करून झाला बाद

40-3 : विराट कोहली धावबाद 

ड्युप्लेसिस आणि रावत स्वस्तात माघारी गेल्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ललित यादवच्या थेट फेकीमुळे विराट कोहली 12 धावांवर धावबाद झाला.

13-2 : आरसीबीचा दुसरा सलामीवीर देखील माघारी  

खलील अहमदने आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला 8 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

5-1: शार्दुलने आरसीबीला दिला पहिला  धक्का अनुज रावत भोपळाही न फोडता माघारी

दोन्ही संघात एक बदल 

रॉयल चॅलेंजर बेंगलोरसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. हर्षल पटेल संघात परतला आहे. त्यामुळे आरसीबीची बॉलिंग तगडी झाली आहे. दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला असून सर्फराज खानच्या जागी मिशेल मार्श संघात आला आहे.

दिल्लीने नाणेफेक जिंकली

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली आणि आरसीबीमध्ये चुरस

मुंबई : रॉयल चॅलेंजरने दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव करत गुणतालिकेत मोठी उडी मारली. बेंगलोरने 8 गुण मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. बेंगलोरकडून हेजलवूडने 3 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. बॅटिंगमध्ये दिनेश कार्तिकने 66 धावांची तर ग्लेन मॅक्सवेलने 55 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com