IPL साठी काढलं 3500 रुपयांचे तिकीट; बसवलं टपऱ्यांवरच्या खुर्चीत

नावं मोठं लक्षण खोटं; 3500 तिकीट काढून बसवलं टपऱ्यांवरच्या खुर्चीत
Brabourne Stadium
Brabourne StadiumSakal

IPL 2022: आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना पार पडला. जगातील सर्वात श्रीमंत लीग अशी ओळख असलेली स्पर्धा याची डोळा याची देही पाहण्यासाठी दोन वर्षांनंतर अखेर मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण प्रेक्षकांना बसण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवरील (Brabourne Stadium) व्यवस्थाही अगदीच गैर सोयीची होती. ज्या प्रेक्षकांनी एका तिकीटासाठी तीन ते साडे तीन हजार रुपये खर्च केले त्यांना चहाच्या टपरीवर असलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यीत बसवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांसाठी हा अनुभव भयावह असाच होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चाहते यासंदर्भात व्यक्तही होत आहेत. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम बांधणीची काम 1936 ला सुरु झाले होते. त्याची स्थापना ही 1937 मध्ये झालीये. तत्कालीन बॉम्बे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या नावावारुन हे स्टेडियम ओळखले जाते. या स्टेडियममध्ये 20,000 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे.

मुंबईमध्ये असलेले ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं होते. सीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यातील तिकाटावरुन वादावरुन या स्टेडियमपासून जवळपास 700 मीटर अंतरावर वानखेडे स्टेडियम बांधण्यात आले. वानखेडे स्टेडियम झाल्यापासून ब्रेबॉन स्टेडियमवर केवळ प्रथम श्रेणीचे सामने खेळवले जायचे. मागील काही वर्षात ब्रेब्रॉन स्टेडियवरही आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत.

मुंबईतील या स्टेडियमुळे मराठी भावना दुखावल्याचा इतिहास

माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट आणि विदर्भातून येऊन मुंबईत आपला ठसा उमटवणारे शेषराव वानखेडे यांच्यात ब्रेब्रॉन स्टेडियमवरुन वाद झाला होता. विधानसभेतील आमदारांच्या संघात एक सामना खेळवावा, अशी मागणी शेषराव वानखेडे यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी तत्कालीन सीसीआय विजय मर्चंट यांनी आमदारांच्यातील सामन्यासाठी मैदान देणं नाकारले होते. यावेळी वानखेडे यांनी नवे स्टेडियम बांधण्याची भाषा केली. यावेळी मर्चंट यांनी घाटी असा उल्लेख करुन तुम्ही काय स्टेडियम बांधणार असा उल्लेख करुन मराठी माणसाच्या भावना दुखावल्याचाही इतिहास आहे. वानखेडे यांनी स्टेडियम बांधून घाटी माणूस काय करु शकतो हे दाखवून दिलं होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com