IPL Final सुरू होण्यापूर्वीच झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड | Guinness Book Of World Record | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guinness Book Of World Record

IPL Final सुरू होण्यापूर्वीच झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Guinness Book Of World Record: आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सांगता आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या अंतिम सामना खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी समारोप समारंभ (IPL Closing Ceremony) झाला. तब्बल तीन वर्षानंतर आयपीएलचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होते. कोरोना साथरोगामुळे गेली तीन वर्षे अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी होती.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 6.30 वाजता भव्य सोहळ्याला सुरुवात झाली. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये जवळपास 1 लाख 20 हजार लोक उपस्थित होते. कोणत्याही आयपीएल सामन्यातील ही सर्वाधिक उपस्थिती आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसोबतच मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदी उच्च अधिकारीही स्टेडियममध्ये उपस्थित होते.

भारतीय क्रिकेट चाहत्यांना समर्पित जगातील सर्वात मोठी जर्सी समारंभाच्या सुरुवातीला दाखवण्यात आली. या जर्सीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठी जर्सी असल्याचा विक्रम केला आहे. जर्सीच्या मागील बाजूस 'IPL 15' असे लिहिले आहे. या हंगामात खेळणाऱ्या सर्व 10 संघांचे लोगो लावले आहे. इतिहास रचणाऱ्या आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ही जर्सी बनवण्यात आली आहे.

15 व्या हंगामातील अंतिम सामान्यामध्ये आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फायनलमध्ये गुजरातचे पारडे नक्कीच थोडे जड आहे, पण राजस्थान रॉयल्सने आपल्या खेळाचा स्तर उंचावत चाहत्यांना आत्मविश्वास दिला आहे.

Web Title: Ipl 2022 Final Guinness Book Of World Record Worlds Biggest Jersey Launch Gt Vs Rr

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top