IPL 2022: चेन्नईसमोर आज गुजरातचे आव्हान; दुसऱ्या विजयासाठी सज्ज

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये येण्याच्या प्रतीक्षेत
IPL 2022 GT vs CSK  Today Match
IPL 2022 GT vs CSK Today Match SAKAL

IPL 2022: गुजरात टायटन्स व गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आयपीएल लढत रंगणार आहे. याप्रसंगी उभय संघ सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या मोसमात पहिल्या चार लढतींत हार सहन करावी लागली, पण पाचव्या लढतीत या संघाने फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवत गुणांचे तसेच विजयाचे खाते उघडले. या लढतीत रॉबिन उथप्पा, शिवम दुबे यांनी झंझावाती फलंदाजी केली. तसेच माहीश थिकशाना व जडेजा यांनी प्रभावी गोलंदाजी केली.(IPL 2022 | GT vs CSK Today Match)

ऋतुराज, मोईन, अंबातीच्या फॉर्मची प्रतीक्षा

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये येण्याची प्रतीक्षा करीत आहे. मागील मोसमात जबरदस्त फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू मोईन अली व मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू हे तिघे फॉर्ममध्ये आल्यास चेन्नई सुपरकिंग्जसाठी हिताचे ठरणार आहे.

चार विजयांसह ८ गुणांची कमाई

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने चार विजयांसह ८ गुण संपादन केले आहेत. त्यामुळे हा संघ फॉर्ममध्ये आहे असे वेगळे सांगायला नको. कर्णधार हार्दिक व शुभमन गिल यांनी प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली आहेत. अभिनव मनोहर व डेव्हिड मिलर हेदेखील फॉर्ममध्ये आले आहेत. राहुल तेवतिया फिनीशरची भूमिका उत्तम पार पाडत आहे.

आजची आयपीएल लढत

गुजरात टायटन्स - चेन्नई सुपरकिंग्ज

महाराष्ट्र असोसिएशन स्टेडियम, पुणे

रात्री ७.३० वाजता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com