IPL 2022 Gujarat Titans vs Chennai Super Kings
IPL 2022 Gujarat Titans vs Chennai Super KingsESAKAL

CSK vs GT : गुजरातचा मिलर ठरला किलर; सीएसकेचा जॉर्डन व्हिलन

मिलरने 51 चेंडूत 94 धावा करत विजय आणला खेचून पाहा हाईलाईट्स 

कर्णधार राशिद खानचा धडाका 22 चेंडूत ठोकल्या 41 धावा 

87-5 : तेवतियाने सोडली मिलरची साथ 

गुजरात अडचणीत असताना डेव्हिड मिलर एका बाजूने झुंज देत होता. त्याने तेवतियाबरोबर पाचव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी रचली. मात्र ब्राव्होने राहुल तेवतियाला 6 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

मिलरचे झुंजार अर्धशतक

48-4 : संथ खेळणारा साहा अखेर पॅव्हेलिनमध्ये

गुजरातच्या फलंदाजीला गळती लागली असताना एका बाजूने सावध पवित्रा घेतलेल्या वृद्धीमान साहाला अखेर कर्णधार रविंद्र जडेजाने 11 धावांवर बाद केले.

16-3 : तिक्षाणाचा 'तीक्ष्ण' मारा 

महीश तिक्षाणाने गुजरातला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. त्याने विजय शंकरला खातेही उघडू दिले नाही. तर अभिनव मनोहरला 12 धावांवर बाद करत गुजरातची अवस्था 3 बाद 16 अशी केली.

1-1 : पहिल्याच षटकात गुजरातला धक्का

मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात गुजरातला मोठा धक्का दिला. त्याने शुभमन गिलला भोपळाही फोडू दिला नाही.

जडेजाची फटेकबाजी चेन्नईच्या 20 षटकात 5 बाद 169 धावा 

रविंद्र जडेजाने अखेरच्या षटकात सलग दोन षटकार मारत चेन्नईला 169 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 12 चेंडूत 22 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने 17 चेंडूत 19 धावा केल्या.

131-4 : सीएसकेचा धावांचा 'ऋतू' सरला

चेन्नईचा नुकताच फॉर्ममध्ये आलेला ऋतुराज गायकवाड मोक्याच्या क्षणी 73 धावांची खेळी करून बाद झाला. त्याला यश दयालने बाद केले. त्यानंतर चेन्नईची धावगती रोडावली.

124/3 : 92 धावांची भागीदारी जोसेफने संपवली

ऋतुराज गायकवाड बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची दमदार भागीदारी करणारा अंबाती रायुडूला अलझारी जोसेफने 46 धावांवर बाद केले. रायुडूचे अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकले.

ऋतुराजची अखेर बॅट तळपली

आयीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात खराब करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला अखरे सूर गवसला. त्याने अर्धशतक ठोकत चेेन्नईचा डाव सावरला.

32-2 : मोईन अलीने ऋतुराजची साथ सोडली

चेन्नईचा अव्वल फलंदाज म्हणून गणणा होणाऱ्या मोईन अलीला अजूनही सूर गवसलेला नाही. अलझारी जोसेफने त्याला अवघ्या 1 धावेवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला.

7-1 : चेन्नईला पहिला धक्का

मोहम्मद शामीने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिला. त्याने गेल्या सामन्यात दमदार 88 धावांची खेळी करणाऱ्या रॉबिन उथप्पाला 3 धावांवर बाद केले.

हार्दिक पांड्या सामन्याला मुकणार; राशिद करणार नेतृत्व

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सीएसकेविरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या ऐवजी संघाचे नेतृत्व राशिद खान करणार आहे. तसेच हार्दिकच्या जागी अलझारी जोसेफला संधी मिळाली आहे. तसेच मॅथ्यू वेडच्या जागी वृद्धीमान साहाला खेळवण्यात आले आहे.

गुजरातचा धडाका चेन्नई रोखणार का?

पुणे : शेटवच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात डेव्हिड मिलरने झुंजार खेळी करत 51 चेंडूत 94 धावा चोपल्या. त्याला प्रभारी कर्णधार राशिद खाननने 41 धावांची तुफानी खेळी करत मोलाची साथ दिली.

चेन्नईचे 170 धावांचे आव्हान घेऊन मैदनात आलेल्या गुजरातला पहिल्याच षटकात धक्का बसला. मुकेश चौधरीने शुभमन गिलला भोपळाही न फोडू देता पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. त्यानंतर चेन्नईचा फिरकीपटू महीश तिक्षाणाने विजय शंकर (०) आणि अभिनव मनोहरला (12) बाद करत गुजरातची अवस्था 3 बाद 16 अशी केली.

या पडझडीनंतर वृद्धीमान साहा आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने साहाला बाद करत हा प्रयत्न हाणून पाडला. पाठोपाठ ब्राव्होने तेवतियाला देखील बाद केले. गुजरातची अवस्था 5 बाद 87 अशी झाली.

त्यानंतर प्रभारी कर्णधार राशिद खानने तुफान फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. त्याने ख्रिस जॉर्डनच्या 18 व्या षटकात 25 धावा चोपून सामना रंगतदार स्थितीत आणला. राशिदने ब्राव्होला देखील चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्राव्होने खानची 22 चेंडूत 41 धावांची खेळी संपवली. आता शेवटच्या षटकात गुजरातला 13 धावांची गरज होती.

मात्र चोप पडलेल्या ख्रिस जॉर्डनला मिलरने षटकार ठोकत सामना 3 चेंडूत 7 धावा असा आणला. मात्र जॉर्डनने नो बॉल टाकून मिलरला आयते कोलित दिले. मिलरने फ्री हिटवर चौकार मारत सामना 2 चेंडू 2 धावा असा आणला. मिलरने पुढच्याच चेंडुवर दोन धावा करत सामना जिंकून दिला. मिलरने 51 चेंडूत नाबाद 94 धावांची विजयी खेळी केली.

आयपीएलच्या 29 व्या सामन्यात आज गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शामीने रॉबिन उथप्पाला 3 धावेवर बाद करत गुजरातला चांगली सुरूवात करून दिली. मात्र यंदाच्या हंगामात ज्याची बॅट शांत होती त्या ऋतुराज गायकवाडची बॅट तळपायला सुरुवात झाली.

त्याने पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी केली. दरम्यान, मोईन अलीने देखील त्याची साथ सोडली. मात्र सेट झालेल्या ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूने तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी 92 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, गायकवाडने अर्धशतक पूर्ण केले. मात्र जोसेफने रायुडूला 46 धावांवर बाद करत अर्धशतकाची संधी हिरावून घेतली.

त्यानंतर ऋतुराजने गिअर बदलत आक्रमक होण्याचा प्रयत्न केला मात्र यश दयालने त्याची 73 धावांची खेळी संपवली. त्यानंतर गुजरताच्या गोलंदाजांनी सीएसकेच्या रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेला फार हात खोलण्याची संधी दिली नाही. अखेर जडेजाने 20 व्या षटकात सलग दोन षटकात मारत सीएसकेला 169 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com