मुंबई : गुजरातच्या राशिद खान आणि राहुल तेवतियाने शेवटच्या दोन षटकात 35 धावा ठोकत हैदराबादचा विजयी घास हिसकावून घेतला. राशिद खानने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत हैदराबादचे 196 धावांचे आव्हान पार केले. हैदराबादकडून उमरान मलिकने 4 षटकात 25 धावा देत 5 विकेट घेतल्या. मात्र मार्को येनसेनने त्याच्या कष्टावर पाणी फेरले. अखेरच्या षटकात 25 धावा दिल्या.