IPL 2022 Lucknow Super Giants Squad : अनकॅप्ड खेळाडूवर लावली विक्रमी बोली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Lucknow Super Giants Squad

IPL 2022 Lucknow Squad: अनकॅप्ड खेळाडूवर लावली विक्रमी बोली!

IPL 2022 Lucknow Super Giants Squad : लखनऊ सुपर जाएंट्स आयपीएलच्या मेगा लिलावात पर्समधील सर्व 90 कोटी खर्च करणारी टीम ठरली. नव्या संघानं अनकॅप्ड आवेश खानसाठी 10 कोटी मोजले. आयपीएलच्या इतिहासात अनकॅप्ड प्लेयरवर लागलेली ही विक्रमी बोली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा जेतेपद मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीर नव्या फ्रँचायझीचा मेंटॉर आहे. त्याने मजबूत संघ बांधणी करण्याचा प्लॅन यशस्वीपणे पार पाडल्याचे दिसते. कॅरेबियन ऑल राउंडर जेसन होल्डर, दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा ओपनर आणि यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकसह देशी माल मनिष पांड्येवर लखनऊने मोठी बोली लावली. (IPL 2022 KL Rahul Lucknow Super Giants Squad After IPL Mega Auction)

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून दिसलेल्या क्रुणाल पांड्यालाही त्यांनी आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. याशिवाय दीपक हुड्डावर त्यांनी कोट्यवधीची यशस्वी बोली लावली. नवी फ्रँचायझीनं नियमावलीनुसार, मेगा लिलावाआधी तीन तगड्या खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली होती. लोकेश राहुलला त्यांनी कॅप्टन म्हणून संघात घेतले. त्याच्यासह मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिश्नोई यांच्यावर त्यांनी खर्च केला होता.

हेही वाचा: IPL Auction : शाहरुख खानची गोष्ट प्रिती मनावर घेणार?

Lucknow Super Giants ने मेगा लिलावापूर्वी घेतलेले खेळाडू

लोकेश राहुल .(17 कोटी)

मार्कस स्टॉयनिस (9.2 कोटी)

रवी बिश्नोई (4 कोटी)

हेही वाचा: IPL Auction : मोजके कपडे घ्या अन् पटकन वेन्यूवर या!

मेगा लिलावात कोणत्या खेळाडूसाठी किती मोजले?

क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) Overseas Wicket Keeper ₹6,75,00,000

मनिष पांड्ये (Manish Pandey ) Indian Batsman ₹4,60,00,000

जेसन होल्डर (Jason Holder) Overseas All-Rounder ₹8,75,00,000

दीपक हुड्डा (Deepak Hooda) Indian All-Rounder ₹5,75,00,000

क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) Indian All-Rounder ₹8,25,00,000

मार्क वूड (Mark Wood) Overseas Bowler ₹7,50,00,000

आवेश खान (Avesh Khan) Indian Bowler ₹10,00,00,000

अंकित सिंग राजपूत (Ankit Singh Rajpoot) Indian Bowler ₹50,00,000

के गौथम (K. Gowtham) Indian All-Rounder ₹90,00,000

दुश्मंता चमिरा (Dushmanta Chameera) Overseas Bowler ₹2,00,00,000

शहाबाज नदीम (Shahbaz Nadeem) Indian Bowler ₹50,00,000

मनन ओहरा (Manan Vohra) Indian Batsman ₹20,00,000

एविन लुईस (Evin Lewis) Overseas Batsman ₹2,00,00,000

मोहसीन थान (Mohsin Khan) Indian Bowler ₹20,00,000

मयांक यादव (Mayank Yadav) Indian Bowler ₹20,00,000

आयुष बदोनी (Ayush Badoni) Indian All-Rounder ₹20,00,000

कायले मेयर्स (Kyle Mayers) Overseas All-Rounder ₹50,00,000

करन शर्मा (Karan Sharma) Indian All-Rounder ₹20,00,000

Web Title: Ipl 2022 Kl Rahul Lucknow Super Giants Squad After Ipl Mega Auction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top