KKR vs LSG : लुईसचा कॅच अन् स्टॉयनिसने उडवली दांडी; लखनौचा निसटता विजय

IPL 2022 Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants
IPL 2022 Kolkata Knight Riders vs Lucknow Super GiantsESAKAL

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर लखनौ सुपर जायंटने कोलकाता नाईट रायडर्सवर 2 धावांनी निसटता विजय मिळवला. शेवटच्या षटकात 21 धावांची गरज असताना रिंकू सिंह आणि सुनिल नारायणने 18 धावांपर्यंत मजल मरली. मात्र सामना 2 चेंडूत 3 धावा असा असताना स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लुईसने रिंकूचा अप्रतिम झेल पकडला आणि सामन्याला कलाटनी मिळाली. रिंकून 15 चेंडूत 40 तर 7 चेंडूत 21 धावा केल्या. त्यापूर्वी श्रेयस अय्यरने 50 तर नितीश राणाने 42 धावांची खेळी केली. लखनौकडून स्टॉयनिसने 3 तर मोहसीन खानने 3 बळी टिपले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने 140 धावा केल्या तर कर्णधार राहुलने 68 धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनी 210 धावांची नाबाद सलामी दिली.

Highlights

रिंकू - सुनिल नारायणने चोपला; पण, लुईसच्या एका हातत घेतलेल्या कॅचने सामना फिरला

केकेआरच्या पाठोपाठ विकेट पडल्यानंतर ते सामना हरणार असे वाटत होते. मात्र रिंकू सिंह आणि सुनिल नारायणने शेवटच्या चार षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी शेवटच्या सामन्यात 21 धावांची गरज असताना 18 धावा करत सामना दोन चेंडूत 3 धावा अशी आणली. मात्र पाचव्या चेंडूवर 15 चेंडूत 40 धावा करणारा रिंकू सिंह झेलबाद झाला. स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लईसने एका हातात झेल घेत सामन्याचे पारडे फिरवले. अखेर स्टॉयनिसने शेवटच्या चेंडूवर उमेश यादवचा त्रिफळा उडवत सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला.

150-6 :  केकेआरचा हुकमी एक्का देखील माघारी

केकेआरचा हुकमी एक्का आंद्रे रसेल 11 चेंडूत 5 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला मोहसीन खानने बाद केले.

142-5 : बिलिंग्जची 42 धावांची खेळी संपली

131-4 : श्रेयस अय्यर 50 धावा करून बाद 

डाव सावरण्याच्या प्रयत्नता नितीश राणा बाद 

केकेआरचे सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर नितीश राणा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावण्यास सुरूवात केली. नितीश राणाने आक्रमक फलंदाजी करत 22 चेंडूत 42 धावा केल्या मात्र कृष्णाप्पा गौतमने त्याला बाद करत ही जोडी फोडली.

9-2 : केकेआरला दोन धक्के

लखनौने ठेवलेले 211 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. व्यंकटेश अय्यर पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्याला मोहसीन खानने बाद केले. त्यानंतर अजिंक्यच्या जागी आलेला अभिजीत तोमर (4) देखील मोहसीन खानची शिकार झाला.

क्विंटन डिकॉकचे दमदार शतक; लखनौ बिनबाद 210 धावा

लखनौ सुपर जायंट्सने दमदार फलंदाजीचा नुमना पेश करत बिनबाद 210 धावा केल्या. क्विंटन डिकॉकने 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या. तर केएल राहुलने 51 चेंडूत 68 धावा केल्या.

क्विंटन डिकॉकचे दमदार शतक 

सलामीवीर क्विंटन डिकॉकने दमदार शतकी खेळी करत लखनौ सुपर जायंटला 200 धावांच्या जवळ नेले. त्याला कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी करत उत्तम साथ दिली.

डिकॉक - केएल राहुलची नाबाद शतकी सलामी

राहुल - डिकॉकची अर्धशतकी सलामी 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने दमदार सुरूवात केली. केएल राहुल आणि क्विटंन डिकॉकने आठव्या षटकात अर्धशतक धावफलकावर लावले.

लखनौने नाणेफेक जिंकली

लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरने आपल्या संघात एक बदल केला असून अजिंक्य रहाणेच्या जागी अभिजीत तोमरला संघात स्थान दिले आहे. तर लखनौने संघात तीन बदल केले आहेत. क्रुणाल पांड्या दुखापतीने त्रस्त आहे त्यामुळे हा सामना खेळणार नाही. चमीरा आणि आयुष बदोनीला देखील संघातून वगळले आहे. त्यांच्या जागी मनन व्होरा, एल्विस लुईस आणि कृष्णाप्पा गौतम संघात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com