
पुणे : कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सने बॉलिंग मधील बदला बॅटिंगमध्ये घेतला. त्याने 14 चेंडूत ठोकलेल्या अर्धशतकामुळे केकेआरने मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव केला. मुंबईचे 162 धावांचे आव्हान केकेआरने 16 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून कमिन्सने 56 तर व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत 50 धावा केल्या.
केकेआरचा डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा फेल गेला. त्याला मुर्गन अश्विनने बाद केले.
केकेआरचे दोन मोठे शिलेदार माघारी परतल्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि सॅम बिलिंग्जने केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मुर्गन अश्विने बिलिंग्जला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
डॅनियल सॅम्सने केकेआरला मोठा धक्का दिला. त्याने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला 10 धावांवर बाद करत पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का दिला.
केकेआरचा सलामीवीर अजिंक्य रहाणेची खराब कामगिरी आजच्या सामन्यातही पहायला मिळाली. त्याला टायमल मिल्सने 7 धावांवर बाद केले.
गेल्या दोन सामन्यापासून आपल्या लयीत नसलेल्या पोलार्डने अखेर आजच्या सामन्यात आपला रंग दाखवून दिला. त्याने अखेरच्या षटकात 3 षटकार ठोकत 23 धावा केल्या. पोलार्डच्या 5 चेंडूत केलेल्या 22 धावांमुळे मुंबई इंडियन्स 161 धावांपर्यंत पोहचला.
36 चेंडूत 52 धावांची खेळी करणारा सूर्यकुमार यादवला पॅट कमिन्सने बाद करत शेवटच्या षटकात मुंबईला मोठा धक्का दिला.
आक्रमक शैलीचा इशान किशन आजच्या सामन्यात संथ झाला. त्याने 22 चेंडूत 14 धावा केल्या. अखेर त्याची ही संथ खेळी पॅट कमिन्सने संपवली.
दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले.
वरूण चक्रवर्तीने डेवाल्ड ब्रेविसला 29 धावांवर बाद करत मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का दिला.
यंदाच्या आयपीएल हंगामात भलच्यात फॉर्ममध्ये असलेल्या उमेश यादवने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 3 धावांवर बाद केले.
मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. सूर्यकुमार यादव आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांना संधी मिळाली आहे. तर केकेआकडून पॅट कमिन्स राशिख सलाम यांना संधी दिली आहे.
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.