IPL 2022 : लखनऊ सुपर जाएंट्सची पहिली जर्सी लॉन्च, पाहा खास झलक | Lucknow Super Giants jersey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lucknow Super Giants jersey

IPL 2022 : लखनऊ सुपर जाएंट्सची पहिली जर्सी लॉन्च, पाहा खास झलक

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022 ) च्या 15 व्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेआधी यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मैदानात उतरणाऱ्या लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants jersey) संघाने आपली नवी जर्सी लॉन्च केली. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाचा पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील (KKR vs CSK) लढतीने 26 मार्चला स्पर्धाला शुभारंभ होईल.

लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जर्सीसह टीमचे गीतही लॉन्स केले आहे. लखनऊचा संघ मैदानात उतरणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांची जर्सी कशी असणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. लखनऊ संघातील खेळाडूंनी प्रॅक्टिसमध्ये घातलेल्या जर्सीवरुन त्याता थोडाफार अंदाजही आला होता.

हेही वाचा: VIDEO : रोहितच्या फोटोशूटआधी काय घडलं; पाहा 'बिहाइंड द सीन'

लखनऊ संघाने भारतीय संघाचा सलामीवीर आणि याआधी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केलेल्या लोकेश राहुलला कॅप्टन केले आहे. अँडी फ्लॉवर हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. मेगा लिलावाआधी लखनऊने लोकेश राहुलसह मार्कस स्टोयनिस आणि रवि बिश्नोई यांना आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. मेगा लिलावात दुश्मंता चमीरा, दीपक हु्ड्डा, मनीष पांडे, आवेश खान या युवा खेळाडूंवर संघाने विश्वास दाखवला. गौतम गंभीर संघाच्या मेंटॉर म्हणून काम पाहणार आहेत.

हेही वाचा: जर योगा योग जुळला तर RCB जिंकेल यंदाची IPL ट्रॉफी

लखनऊचा संघ आपल्या पहिल्या आणि सुरुवातीच्या सीझनची सुरुवात गुजरात टायटन्स या नव्या संघाविरुद्धच्या लढतीने करणार आहे. दोन्ही संघातील सामना 28 मार्चला वानखेडेच्या मैदानात खेळवला जाणार आहे. दोन्ही नव्या संघात विजयी सलामी कोण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Ipl 2022 Lucknow Super Giants Jersey Launched For Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLIPL 2022Lokesh Rahul
go to top