LSG vs GT : राशिद खानचा भेदक मारा; लखनौला 82 धावातच गुंडाळले

IPL 2022 Lucknow Super Giants vs Gujarat Titans
IPL 2022 Lucknow Super Giants vs Gujarat Titans esakal
Updated on

पुणे : गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंटचा तब्बल 62 धावांनी पारभव करत गुणतालिकेतले आपले अव्वल स्थान पुन्हा पटकावले. लखनौसमोर ठेवलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ 82 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खानने भेदक मारा करत 24 धावात 4 बळी घेतले. याचबरोबर त्याने टी 20 मधील आपल्या 450 विकेट देखील पूर्ण केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याला डेव्हिड मिलर 26 आणि राहुल तेवतियाने 22 धावा करत चांगली साथ दिली. (Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants Regain Top Spot In IPL 2022 Point Table)

पाहा हायलाईट्स VIDEO

82-10 : राशिद खानचा जलवा, लखनौचा संघ 82 धावात माघारी

राशिद खानने भेदक मारा करत 24 धावाच 4 बळी घेतले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे लखनौ सुपर जायंटचा संघ 82 धावात माघारी गेला.

65-6 : स्टॉयनिस धावबाद,लखनौ अडचणीत

लखनौचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर मार्कस स्टॉयनिसकडून आशा होत्या मात्र तो 2 धावांवर धावबाद झाला.

61-5 : लखनौचा निम्मा संघ माघारी

साई किशोरने आयुष बदोनीने 8 धावांवर बाद करत लखनौचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

45-4 : क्रुणाल पांड्याने देखील केली निराशा

लखनौ सुपर जायंट अडचणीत असताना अष्टपैलू क्रुणाल पांड्या झुंज देईल असे वाटत होते. मात्र राशिद खानने त्याला 5 धावांवर बाद करत लखनौला चौथा धक्का दिला.

33-3 : करण शर्मा 4 धावांची भर घालून परतला

24-2 : मोहम्मद शामीने दिला लखनौला मोठा धक्का

मोहम्मद शामीने लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलला 8 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

19-1 : लखनौला पहिला धक्का

गुजरात टायटन्सचे 145 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंटला यश दयालने पहिला धक्का दिला. त्याने क्विंटन डिकॉकला 11 धावांवर बाद केले.

शुभमन गिलच्या नाबाद 63 तर तेवतियाच्या आक्रमक 22 धावा, लखनौसमोर 145 धावांचे आव्हान

शुभमन गिलचे झुंजार अर्धशतक

गुजरात टायटन्सचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सलामीवीर शुभमन गिलने एक बाजू सावरून धरत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने आपले अर्धशतक 42 चेंडूत पूर्ण केले.

103-4 : मिलरनेही गिलची साथ सोडली

गुजरातची अवस्था 3 बाद 51 अशी झाली असताना सलामीवीर शुभमन गिलने झुंजार फलंदाजी केली. मात्र त्याला साथ देणारा डेव्हिड मिलर 26 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला जेसन होल्डरने बाद केले.

51-3 : गुजरातच्या कर्णधाराकडून निराशा

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला आजच्या सामन्यात देखील फारशी चमक दाखवता आलेली नाही. तो आवेश खानच्या गोलंदाजीवर 11 धावांवर बाद झाला.

24-2 : मॅथ्यू वेड 10 धावांची भर घालून परतला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला आवेश खानने दुसरा धक्का दिला. त्याने मॅथ्यू वेडला 10 धावांवर बाद केले.

गुजरातला पहिला धक्का

मोहसीन खानने गुजरातला पहिला धक्का दिला. त्याने वृद्धीमान साहाला 5 धावांवर बाद केले.

दोन्ही संघात एक एक बदल

लखनौ सुपर जायंटकडून करण शर्मा हा पदार्पण करणार आहे. तर गुजरात टायटन्सकडून साई किशोर पदार्पण करणार आहे.

गुजरातने नाणेफेक जिंकली

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com