IPL 2022 Mega Auction
IPL 2022 Mega Auction Sakal

IPL 2022 : अंबानी अँण्ड कंपनीचे 4 निर्णय; MI ला रडवणार? की...

IPL 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL 2022 Mega Auction) मुंबई इंडियन्सने विक्रमी बोली लावून विशेष छाप सोडली. लिलावाच्या मेगा सोहळ्यात मुंबई इंडियन्सकडून निता अंबानी (Nita Ambani) आणि आकाश अंबानी ( MI Co-Owner Akash Ambani) उपस्थितीत होते. मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सनं अनेक स्टार खेळाडूंना रिलीज केले होते. यातील हार्दिक पांड्या मेगा लिलावाआधीच गुजरात टायटन्सचा झाला. इशान किशन, क्रुणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डिकॉक यांना मुंबई पुन्हा आपल्या ताफ्यात घेईल, असा अंदाज होता. पण इशानसाठी विक्रमी बोली लावणाऱ्या मुंबईनं डिकॉक, क्रुणाल आणि ट्रेंट बोल्ट या स्टार खेळाडूंना दुसऱ्या ताफ्यात जाऊ दिले. याशिवाय जोफ्रा आर्चरची केलेली निवड ही चर्चेचा विषय ठरत आहे. (ipl 2022 mega auction ambani and company 4 mistakes while Mumbai Indians Players Selection )

क्विंटन डिकॉकला सोडणं

क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) मुंबईनं रस दाखवला. पण त्यांनी या खेळाडूसाठी फार जोर लावला नाही. पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने केवळ चार खेळाडू खरेदी केले होते. क्विंटन डिकॉकची परफेक्ट रिप्लेसमेंटचा अभाव मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात दिसून येतो. यष्टीमागचा विचार केल्यास इशानच्या रिप्लेसमेंटसाठी त्यांच्याकडे उत्तर प्रदेशचा युवा आणि अंडर 19 वर्ल्डमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेला आर्यनला Aryan Juya पसंती देण्यात आली आहे.

बेबी एबी ही भविष्यासाठी चांगली गुंतवणूक, पण...

दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी भविष्यात मुंबईच्या डावाला सुरुवात चांगली गुंतवणूक ठरु शकतो. पण सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन्सला सलामीसाठी रोहित ईशानवरच अवलंबून रहावे लागेल. याआधीही मुंबईच्या ताफ्यातून अनेक स्टार टीम इंडियापर्यंत पोहचले आहेत. हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्यासह इशान किशन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जसप्रित बुमराहही मुंबई इंडियन्समध्येच घडला. या जुन्या रणनितीसह मुंबई इंडियन्सने नवी संघ बांधणी केल्याचे दिसते. दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी अर्थात डेवॉल्ड Dewald Brevis हा याच रणनितीचा भाग आहे. त्याच्यासाठी अंबानी अँण्ड कंपनीने 3 कोटी पर्समधून काढण्याची हिंमत दाखवली. या खेळाडूत क्षमता निश्चितच आहे. पण आगामी हंगामात तो फार उपयुक्त ठरेल, असे वाटत नाही. भविष्यासाठी ही एक चांगली गुंतवणुक निश्चित आहे. पण आगामी हंगामात मुंबईला याचा फटका बसू शकतो.

ट्रेंट बोल्टची रिप्लेसमेंट भारी, पण...

मुंबई इंडियन्सनं न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्डलाही पुन्हा ताफ्यात सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्या हाती लागला नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने शेवटच्या टप्प्यात मोठा डाव खेळला. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी (Jofra Archer) त्यांनी राजस्थानशी पंगा घेतला. मोठी किंमत देऊन त्याला ताफ्यात सहभागीही करुन घेतलं. जोफ्राची कामगिरी कमालीच आहे. पण त्याची दुखापत भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी त्रासदायक ठरु शकते. तो फिट राहिला तर मुंबईची ही बोली हिट ठरेल. पण दुखापतीमुळे जर तो स्पर्धेला मुकला तर मात्र संघ गोत्यात येईल.

हार्दिक-क्रुणालची उणीव कोण भरुन काढणार?

आयपीएलच्या इतिहासात विक्रमी पाचवेळा जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यशात हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या या जोडगोळीचा मोठा वाटा आहे. दोन अष्टपैलूंची उणीव भरुन काढण्यासाठी लिलावात मुंबई इंडियन्सने तब्बल 10 अष्टपैलू खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलंय. टीम डेविड आणि फॅबिन एलन या दोन परदेशी खेळाडूंसाठी मुंबईने मोठी रक्कम खर्च केली. दोघांमध्ये क्षमता असली तरी अनुभवाची कमी आहे. ते कितपत फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल. एकूणच अंबानी अँण्ड कंपनीने मेगा लिलावात खेळलेला डाव मुंबई इंडियन्सला रडवणारा ठरणार की हसवणारा हे आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यावरच समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com