IPL 2022 : टेनिस क्रिकेटरसाठी कसा उघडला IPL चा दरवाजा?

IPL 2022 Mega Auction, Who is Ramesh Kumar
IPL 2022 Mega Auction, Who is Ramesh KumarSakal

IPL 2022 Mega Auction, Who is Ramesh Kumar : आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) काही आश्चर्यकारक बोली लागल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाइट रायडर्स (KKR ) ने आपल्या अखेरचा डाव हा रमेश कुमार (Ramesh Kumar) याच्यावर खेळला. 20 लाख मूळ किंमतीसह त्यांनी त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. या खेळाडूची निवड करुन केकेआरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टेनिसच्या मैदानात धुमाकूळ घालणाऱ्या पोराला घेण्याची हिम्मत त्यांनी उगाच दाखवलेली नाही.

मेगा लिलावात त्याच्यावर डाव खेळण्यापूर्वी केकेआरनं या खेळाडूला ट्रायलसाठी बोलावले होते. लिलावातील यादीत रमेशचे नाव हे फलंदाजांच्या यादीत होते. पण त्याची गोलंदाजीतील क्षमता फलंदाजीपेक्षा भारी आहे. डावुखऱ्या हाताने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज ऑफ आणि लेग स्पिन अशा दोन्ही प्रकारे फलंदाजाची फिरकी घेऊ शकतो. सोशल मीडियावर तो 'मोनिकर नरेन जलालाबादिया' (Ramesh Kumar Jalalabad) या नावाने प्रसिद्ध आहे. त्याची गोलंदाजी शैली वेस्ट इंडीज आणि नाइट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनशी मिळती जुळती आहे. त्यामुळेच सोशल मीडियवरील त्याच्या नावात नरेन हा उल्लेक दिसून येतो.

IPL 2022 Mega Auction, Who is Ramesh Kumar
'तुम्ही शांत बसला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील'

टेनिस क्रिकेटच्या मैदानातील सुपरस्टार

रमेश टेनिस क्रिकेट खेळतो. यू-ट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. यात तो गगनचुंबी षटकार मारताना पाहायला मिळेत. त्याच्यातील हीच क्षमता हेरून कोलकाताच्या संघाने त्याला संधी दिली आहे. त्याने प्रोफेशनल स्तरावर क्रिकेट खेळलेले नाही. तरीही पंजाबच्या मनासा येथील रहिवाशी असलेल्या रमेशवर कोलकाताने डाव खेळला.

IPL 2022 Mega Auction, Who is Ramesh Kumar
IPL 2022 KKR Squad : कॅप्टन्सी मटेरियलची मेगा शॉपिंग!

वडील चर्मकार आई विकते मेकअपच सामान

रमेश हा सर्वसामान्य कुटुंबात जन्मला. त्याचे वडील चर्मकार आहेत. तर आई शेजापाजारील गावागावात जाऊन मेकअपचे सामना विकते. छोट्या गाव शहरातील टेनिस मैदानात त्याने आपली ओळख निर्माण केली. टेनिस क्रिकेटमध्ये बॅटिंग-बॉलिंगमधील धमाकेदार खेळीमुळे भागातून त्याला खेळण्यासाठी निमंत्रण यायची.

कोलकाता संघापर्यंत पोहचला कसा?

ईएसपीएन क्रिकेट इन्फोच्या वृत्तानुसार, जिल्हास्तरावर दमदार कामगिरीमुळे त्याची राजस्तरीय क्रिकेट शिबिरासाठी निवड झाली होती. यावेळी तो पंजाबचा अष्टपैलू क्रिकेटर गुरकीरत सिंह मान याला भेटला. गुरकीरत सिंह याने 2016 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. रमेशने त्याला आपल्या आर्थिक परिस्थितीसंदर्भात सांगितले. कोणत्या स्पर्धेसाठी नाव सुचवा असेही रमेशने मान यांना सांगितले होते. गुरकीरतने रमेशचा क्रिकेट खेळताना व्हिडिओ कोलकाता नाइट रायडर्सचे असिस्टेंट कोच अभिषेक नायर ( KKR assistant coach Abhishek Nayar )यांना पाठवला. हा व्हिडिओ पाहूनच कोलकाताने त्याला ट्रायलसाठीही बोलवले. यावेळी त्याने गोलंदाजी आणि फिल्डिंग केली. त्यावर प्रभावित होऊन केकेआरने अखेर या टेनिस स्टारवर भरवसा दाखवत त्याला उत्तम संधी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com