IPL 2022 : पहिल्याच चेंडूत तंबूचा रस्ता अन् विराटचा राग अनावर; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

IPL 2022 : पहिल्याच चेंडूत तंबूचा रस्ता अन् विराटचा राग अनावर; पाहा व्हिडिओ

IPL 2022 : यंदाच्या आयपीएलचा १८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि बेंगलोरमध्ये पुण्यात खेळवला गेला. या सामन्यात बेंगलोरने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. आरसीबीचा स्पर्धेतील हा तिसरा विजय असून या विजयात विराट कोहली ने ३६ चेंडूत ४८ धावा आणि अनुज रावतने ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. दरम्यान आयपीएलची किंग टीम बोलल्या जाणाऱ्या मुंबईला या स्पर्धेतील सलग चौथा सामना गमवावा लागला आहे. या सामन्यात Baby AB नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने पहिल्यांदाच गोलंदाजी करताना कोहलीला आऊट करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हेही वाचा: राजगड : शिवापट्टणवाडा स्थळांच्या उत्खननात सापडले वाड्याचे अवशेष

दरम्यान मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत १५१ धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये सुर्यकुमार यादवने सर्वाधिक ३७ चेंडूत ६८ धावा बनवल्या होत्या परंतु त्यांना या सामन्यात हार पत्करावी लागली आहे. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असला तरी विशेष बाब म्हणजे डेवाल्ड ब्रेविस याने काढलेली विराटची विकेट. १९ व्या षटकात रोहितने त्याच्याकडे चेंडू सोपवल्यावर त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूत विराटला तंबूत परत पाठवले त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

विराटला संताप अनावर

दरम्यान आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करताना त्याने पहिल्याच चेंडूत विराटला आऊट केल्यामुळे विराट संतापल्याचं पहायला मिळाला होता. चेंडू विराटच्या पॅडवर लागल्यावर ब्रेविसने अपिल केल्यावर अंपायरने विराटला आउट घोषित केलं. त्यानंतर त्याने रिव्यूव्ह घेतला असता तिथेही त्याला मार खावा लागला आणि त्याचा राग अनावर झाला. त्याने तंबूत परतत असताना देखील आपली बॅट खाली आदळून अंपायरच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

हेही वाचा: १० अ‍ॅप्सवर गुगलकडून बंदी; तुमच्याकडेही असतील तर तात्काळ करा डिलीट

दरम्यान ब्रेविस याने मुंबईकडून फलंदाजी करताना फक्त ८ धावा बनवल्या होत्या. या सामन्यात मुंबईला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करणाऱ्या आणि पहिल्याचं चेंडूवर विराटसारख्या फलंदाजाला परत पाठवल्याने Baby AB या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसने सर्वांची मने जिंकली.

Web Title: Ipl 2022 Mi Vs Rcb Angry Virat When Out Announced Umpire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top