
MI vs RR : रोहित आउट झाला अन् रितिकाचा चेहरा पडला!
IPL 2022 MI vs RR : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खराब झाली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रित बुमराहने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. टायमल मिल्सचीही त्याला सुरेख साथ लाभली आणि रोहितचा निर्णय़ सार्थ ठरतोय असे चित्र निर्माण झाले. एका बाजूला विकेट पडत असताना जोस बटलरनं शतकी खेळीनं डाव सावरला. त्याच्या शतकासह राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 30 आणि हेटमायर 35 यांच्या छोट्याखानी पण महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात 8 बाद 193 धावा केल्या.
हेही वाचा: Video : शाहरूखच्या पोरीसमोरच अय्यरची 'शाहरूखगिरी'
या धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि इशान किशन मैदानात उतरले. रोहित शर्माने एक उत्तुंग षटकार खेचत आक्रमक अंदाजात खेळण्याचे संकेतही दिले. पण प्रसिद्ध कृष्णाच्या जाळ्यात तो फसला. रियान परागकरवी सोपा झेल देऊन त्याला अवघ्या 10 धावांवर माघारी फिरावे लागले. त्याची विकेट पडल्यानंतर राजस्थानच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण फुलल्याचे दिसले.
हेही वाचा: Video : शाहरूखच्या पोरीसमोरच अय्यरची 'शाहरूखगिरी'
कॅरेबियन स्टार हेटमारयने हटके अंदाजात सेलिब्रेशन केले. पण दुसरीकडे व्हीआयपी स्टँडमध्ये बसलेल्या रितिका सजदेहचा (RitikaSajdeh) चेहराच पडला. रोहित शर्माची पत्नी बऱ्याचदा स्टेडियममध्ये उपस्थितीत राहून सामन्याचा आनंद घेत असते. यावेळीही ती आपली मुलगी समायरासोबत सामना पाहण्यासाठी स्टँडमध्ये बसल्याचे दिसले. पण रोहित स्वस्तात माघारी फिरल्यामुळे तिचा हिरमोड झाला. अवघ्या 15 धावांवर रोहित परतल्याने स्टेडियमवर उपस्थितीत मुंबईकर चाहत्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती.
Web Title: Ipl 2022 Mi Vs Rr Watch Prasidh Krishna Take Rohit Sharmas Wicket Wife Ritika Sajdeh Reaction Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..