
IPL 2022 : फलंदाजीतील अपयशामुळे हरलो ; धोनी
पुणे : ‘‘फलंदाजीतील अपयशामुळे आपल्या संघाला ‘एमसीए’ स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध १३ धावांनी पराभव पत्करावा लागला,’’ असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार एम. एस. धोनी याने सामन्यानंतर व्यक्त केले आहे.
१७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, चेन्नईने पॉवर-प्लेमध्ये ५१/० अशी चांगली सुरुवात केली आणि डेव्हन कॉनवेने ५६ धावा केल्या; पण बाकीचे फलंदाज जास्त काही करू शकले नाहीत, त्यामुळे चेन्नईला १६० असे रोखण्यात पंजाबला यश आले. ‘‘गोलंदाजांनी पंजाबला १७० धावांपर्यंत रोखून चांगले काम केले. मात्र, फलंदाजीने आम्हाला निराश केले. आपण जेव्हा धावसंख्येचा पाठलाग करत असतो, तेव्हा धावफलकावर काय आवश्यक आहे. तसेच गोलंदाज काय करत आहेत हे माहिती असणे अपेक्षित असते,’’ असे धोनीने म्हटले. ‘‘आम्ही चांगली सुरुवात केली, फक्त झाले इतकेच की आम्ही नियमित अंतराने विकेट गमावत राहिलो. त्याचमुळे पराभव झाला, असे त्याने सांगितले.
जडेजाच्या फॉर्मबद्दल चिंता नाही : फ्लेमिंग
चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या फॉर्मबद्दल फारशी चिंता नसल्याचे स्पष्ट केले आहे. फलंदाजी क्रमात स्टार अष्टपैलू खेळाडूसाठी कोणती पोझिशन योग्य आहे हे आम्हाला तपासून पाहावे लागेल, असेही फ्लेमिंग यांना वाटते.
Web Title: Ipl 2022 Ms Dhoni Csk
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..