'खाना कैसे हझम होता है बे ?' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

'खाना कैसे हझम होता है बे ?'

IPL 2022 MI vs LSG : लखनौ विरुद्धच्या सामन्यात मुंबईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेतील मुंबईचा हा सलग सहावा पराभव झाल्यानंतर चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरले असून या पराभवानंतर आता सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. मुंबईच्या विजयाच्या आशेवर असणारे लोक आता निराश झाले असल्याचं पाहायला मिळतंय.

लोकेश राहुलच्या या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९९ धावा काढल्या होत्या. त्यामध्ये कर्णधार लोकेशची शतकी खेळीचे मोठे योगदान होते. त्या धावांचा पाठलाग करताना रोहितचा संघ पुन्हा एकदा कमी पडला आणि २० षटकात ९ गडी गमावत १८१ धावांपर्यंत मजल मारु शकला. या पराभवानंतर मुंबईच्या संघाने सलग सहावा पराभव आपल्या नावे केला आहे.

?त्यानंतर आता ट्वीटरवर रोहित शर्मा ट्रेंड होत आहे. रोहित शर्माला टॅग करुन लोकं ट्वीटरवर मीम्स व्हायरल करताना दिसत आहेत. काही चाहते हे मुंबईसाठी आणि रोहितसाठी IPL 2022 साठीचं मोठ अपयश आहे अशा टॅगलाईन वापरुन ट्वीट करत आहेत. तर काही चाहते. एकतरी सामना जिंका रे... अशी साद घालताना पाहायला मिळतात. दरम्यान रोहितचे वेगवेगळे फोटो पोस्ट केले जात आहेत. तुमको खाना कैसे हजम होता है बे ? असा प्रश्न विचारत मुंबईच्या टीमवर टीका केली जात आहे.

दरम्यान एका चाहत्याने एक फोटो पोस्ट करत मुंबईसाठी एक सल्ला दिला आहे. त्यामध्ये त्याने म्हटलंय की, मुंबईच्या आयोजकांनी ईशान, डेनियल, डेविड यांना संघातून काढायला पाहिजे. कारण त्यांच्यावर खूप पैसे लावले असून त्याऐवजी लिलावात ते कमी पैशात मिळू शकतात असा सल्लाही देण्यात आला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मुंबईच्या चाहत्यांवर मीम्स तयार केले आहेत. या पराभवानंतर मुंबईचा संघ आणि त्यांच्या चाहत्यांची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे.

Web Title: Ipl 2022 Mumbai Indians Six Loss Match Memes Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top