MI vs DC : दिल्लीचे पॅक अप; मुंबईने ऐकली आरसीबीची प्रार्थना

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals
IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitalsesakal

मुंबई : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव करत त्यांचे प्ले ऑफमधून पॅक अप केले. मुंबईच्या या विजयामुळे रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा प्ले ऑफचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मुंबईने दिल्लीचे 160 धावांचे आव्हान 19.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 48 धावा केल्या. त्याला डेवाल्ड ब्रेविसने 37 आणि टीम डेव्हिडने आक्रमक 34 धावा करून साथ दिली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर आणि नॉर्त्जेने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली.

Highlights

मुंबईने दिल्लीचे केले पॅक अप, आरसीबीचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा

 विजयासाठी 5 धावांची गरज असताना तिलक बाद 

मुंबईचा डाव सावरून धरणारा तिलक वर्मा मुंबईला विजयासाठी 5 धावांची गरज असताना 21 धावा करून बाद झाला.

145-4 :टीम डेव्हिड बाद 

तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी करणाऱ्या टीम डेव्हेडला शार्दुल ठाकूरने बाद केले. मात्र त्याने 11 चेंडूत 34 धावा चोपून आपले काम पूर्ण केले होते.

95-3 : शार्दुलने ब्रेविसचा उडवला त्रिफळा

किशन बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे डेवाल्ड ब्रेविसच्या हाती आली होती. मात्र शार्दुल ठाकूरने त्याचा 37 धावांवर त्रिफळा उडवून देत मुंबईचा सेट झालेला बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये धाडला.

76-2 : मुंबईला मोठा धक्का

रोहित बाद झाल्यानंतर डाव सावरणाऱ्या इशान किशनला कुलदीप यादवने 48 धावांवर बाद करत मुंंबईला दुसरा धक्का दिला.

25-1 : रोहित शर्माची खराब कामगिरी

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये पहिला धक्का बसला. नॉर्त्जेने रोहित शर्माला अवघ्या 2 धावेवर बाद केले. त्याने या दोन धावा 13 चेंडू खेळून केल्या.

शार्दुल ठाकूर बाद; दिल्लीची 20 षटकात 7 बाद 159 धावांपर्यंत मजल

143-6 : बुमराहने दिला दिल्लीला मोठा धक्का

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर रोव्हम पॉवेल डावाची सूत्रे आपल्या हातात घेत दिल्लीला 150 धावांच्या जवळ पोहचवले. मात्र जसप्रीत बुमराहने त्याला 43 धावांवर बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.

125-5 : ऋषभ पंत - रोव्हमन पॉवेल जोडी रमनदीप सिंगने फोडली.

50 धावात 4 फलंदाज माघारी गेल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि रोव्हमन पॉवेल यांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र 16 व्या षटकात रमनदीप सिंगने 39 धावा करणाऱ्या ऋषभ पंतला बाद केले.

50-4 : सर्फराजकडून पुन्हा निराशा

दिल्लीचा मधल्या फळीतील सर्फराज खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला मार्कंडेयने 10 धावांवर बाद केले.

31-3 : बुमराहचे दिल्लीला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के

जसप्रीत बुमराहने दिल्लीचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजाला येणाऱ्या मिशेल मार्शला गोल्डन डकवर माघारी धाडले. त्यानंतर पॉवर प्लेची शेवटची ओव्हर टाकताना चौथ्या चेंडूवर 24 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉची देखील शिकार केली.

21-1 : दिल्लीला पहिला धक्का 

डॅनियल सॅम्सने दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरला 5 धावांवर बाद केले.

अर्जुन तेंडुलकर बेंचवरच

मुंबईने आजच्या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी स्टब्सच्या जागी डेवाल्ड ब्रेविस आणि संजय यादव याच्या जागी शौकीन याला स्थान दिले आहे. दिल्लीने देखील आपल्या संघात एक बदल केला असून महत्वाच्या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉ संघात परतला आहे.

मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय 

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com