Points Table: तिसऱ्या विजयासह कोलकता अव्वल; मुंबईची अवस्था बिघडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 | Update

Points Table: तिसऱ्या विजयासह कोलकता अव्वल; मुंबईची अवस्था बिघडली

IPL 2022 : कोलकता नाईट रायडर्स (KKR) ने बुधवारी रात्री IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. केकेआरने चारपैकी तीन सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत. बुधवारी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर केकेआरने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. आयपीएलच्या १५ व्या मोसमातील मुंबईचा हा सलग तिसरा पराभव होता. यासह मुंबईचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर पोहोचला आहे.

IPL 2022 | Update

IPL 2022 | Update

ऑरेंज कॅप -

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरने सध्या इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात अवलं आहे. त्याने तीन सामन्यांत 205 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, मुंबईचा सलामीवीर इशान किशनने 135 धावा केल्या आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आयपीएलमधील ऑरेंज कॅपच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2022 | Update

IPL 2022 | Update

पर्पल कॅप -

वेगवान गोलंदाज उमेश यादवने आतापर्यंत 4 सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या आहेत. उमेश वाढत्या अनुभवाबरोबर गोलंदाजी घातक होत आहे. दुसरा क्रमांक राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि तिसरा क्रमांक लखनऊ सुपर जायंट्सचा आवेश खान आहे. दोघांच्या नावे तीन सामन्यांत प्रत्येकी 7 विकेट आहेत.

IPL 2022 | Update

IPL 2022 | Update

Web Title: Ipl 2022 Points Table Orange Cap And Purple Cap After Kkr Vs Mi Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLIPL 2022