VIDEO : स्वत:चा संघर्ष पाहून रडला प्रविण; श्रेयसनं मारली मिठी

Pravin Tambe Gets Emotional At Screening His Biopic
Pravin Tambe Gets Emotional At Screening His Biopic Sakal

भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची संघर्षाची एक वेगळी कहाणी दडलेली असते. लेग-स्पिनर प्रविण तांबेच्या रुपात आणखी एक ह्दयस्पर्शी कथा पडद्याच्या माध्यमातून उलघडण्यात आलीये. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा सहायक गोलंदाजी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या प्रविण तांबेच्या आयुष्यावर आधारित 'कौन प्रवीण तांबे' (Kaun Hai Pravin Tambe) हा चित्रपट रिलीज झालाय. प्रविण तांबेनं आपल्या आयुष्याची कहाणी कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील आपल्या सहकाऱ्यांसोबत स्क्रीनवर पाहिली. चित्रपट बघितल्यानंतर तो भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे आल्यानंतर काही मिनिटे प्रविण स्तब्ध उभे राहिल्याचे दिसले. कोलकाता नाईट रायडर्सने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केलाय.

प्रविण तांबेने 2013 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्‍थान रॉयल्‍स (RR) कडून पदार्पणाचा सामना खेळला होता. तो मोठ्या संघर्षातून इथपर्यंत पोहचला. काम आणि क्रिकेट असे संतुलन साधत त्याने लक्षवेधी कामगिरीही करुन दाखवली. आयपीएलमध्ये तो (IPL) गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडूनही खेळला आहे.

प्रविण तांबेनं 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण

“कौन प्रवीण तांबे” नावाचा चित्रपट 2 एप्रिलला रिलीज झाला. केकेआरच्या सहकाऱ्यांसोबतच प्रविणने आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपट पाहिला. शो संपल्यानंतर तो मनोगत व्यक्त करायला पुढे आला, “मैं कहना चाहता हूं….” एवढं बोलून तो स्तब्ध झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. डोळ्यात आसवं आणि अडखळत बोलताना प्रविण स्वप्न पाहा ती खरी होतात, असा संदेशही दिला.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनंही प्रविणवर साकारण्यात आलेल्या चित्रपटावर भाष्य केले. तो म्हणाला की, हा चित्रपट पाहण्यासाठी माझ्यासह संघातील सर्व सहकारी उत्सुक होते. ही खूपच भावूक सिनेमा आहे. चित्रपटातील गाणीही उत्तम आहेत. पीटी (प्रविण तांबे) ज्यावेळी बोलत होता त्यावेळी डोळ्यातून पाणी आले, अशा शब्दांत श्रेयस अय्यरनं चित्रपटासह प्रविणच्या कहाणी भावूक असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com