IPL 2022 PBKS vs DC : शार्दुलने पंजाबला करायला लावला भांगडा; दिल्लीचा विजय

IPL 2022 Punjab Kings vs Delhi Capitals
IPL 2022 Punjab Kings vs Delhi Capitalsesakal

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. दिल्लीने ठेवलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या तगड्या फलंदाजीला 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत 4 बळी टिपले. तर अक्षर पटेल, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. पंजाबकडून जितेश शर्माने एकाकी झुंज देत 44 धावा केल्या. दिल्लीकडून फलंदाजी करताना मिशेल मार्शने दमदार खेळी करत 63 धावा केल्या. त्याला सर्फराज खानने आक्रमक 32 धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून लिव्हिंगस्टो अर्शदीपने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

Highlights

पंजाबचा 17 धावांनी पराभव

123-8 : झुंजार खेळी करणारा शर्मा बाद

अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या जितेश शर्माला (44) शार्दुल ठाकूरने 18 व्या षटकात बाद करत पंजाबला आठवा धक्का दिला.

82-7 : अक्षर पटेलने दुसऱ्यांदा उडवला त्रिफळा

अक्षर पटेलने ऋषी धवनचा 4 धावांवर त्रिफळा उडवला.

67-6 : दिल्लीच्या फिरकीचा कहर

शार्दुल ठाकूर आणि नॉर्त्जेने पंजाबची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर दिल्लीच्या फिरकीने मधली फळी कापायला सुरूवात केली. कुलदीप यादवने खतरनाक लिव्हिंगस्टोनला 3 धाांवर बाद केले. तर अक्षर पटेलने मयांकचा शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर पुन्हा एकदा कुलदीपने पंजाबला धक्का देत हरप्रीत ब्रारला अवघ्या 1धावेवर पॅव्हेलियनमध्ये धाडले.

54-3 : पंजाबला दिल्लीने पॉवर प्लेमध्येच दिले तीन धक्के

दिल्लीने ठेवलेले 160 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबला दिल्लीने पॉवर प्लेमध्येच तीन धक्के दिले. नॉर्त्जेने आक्रमक जॉनी बेअरस्टोला 28 धावांवर बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने शिखर धवनला 19 तर भानुका राजपक्षेला 4 धावांवर बाद केले.

पंजाबसमोर 160 धावांचे आव्हान

154-7 : अर्शदीपने केली तिसरी शिकार

दिल्लीने कसाबसा 150 चा टप्पा पार केल्यानंतर शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने शार्दुल ठाकूरला 3 धावांवर बाद करत आपली तिसरी शिकार केली.

दमदार अर्धशतक ठोकणारा मिशेल मार्श झाला बाद 

दिल्लीचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना मिशेल मार्शने झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकले. मात्र त्याला रबाडाने 63 धावांवर बाद केले.

112-5 : लिव्हिंगस्टोनचा भेदक मारा

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद करणाऱ्या लिम लिव्हिंगस्टोनने दिल्लीच्या मधल्या फळीला देखील धक्के दिले. त्याने ऋषभ पंतला 7 तर रोव्हमन पॉवेलला 2 धावांवर बाद केले.

98-3 : ललित यादवनेही साथ सोडली

सर्फराज खान बाद झाल्यानंतर ललित यादव आणि मिशेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ललित यादवने 24 धावा करत मार्शची साथ सोडली. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले.

51-2 : आक्रमक सर्फराज खान बाद 

डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सलामीवीर सर्फराज खानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याने 16 चेंडूत 32 धावा ठोकत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र त्याला अर्शदीप सिंगने 32 धावांवर बाद केले.

0-1 : डेव्हिड वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बाद

पांजब किंग्जने पहिल्याच षटकात फिरकीपटूच्या हातात चेंडू दिला. लेग स्पिनर लिम लिव्हिंगस्टोनने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद केले.

पंजाबने नाणेफेक जिंकली

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी पंजाबने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तर दिल्लीने दोन बदल केले आहेत. चेतन साकरियाच्या जागी खलील अहमद आणि श्रीकार भारतच्या जागी सर्फराज अहमदचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. दिल्लीने ठेवलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या तगड्या फलंदाजीला 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत 4 बळी टिपले. तर अक्षर पटेल, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. पंजाबकडून जितेश शर्माने एकाकी झुंज देत 44 धावा केल्या. दिल्लीकडून फलंदाजी करताना मिशेल मार्शने दमदार खेळी करत 63 धावा केल्या. त्याला सर्फराज खानने आक्रमक 32 धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून लिव्हिंगस्टो अर्शदीपने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com