PBKS vs RR : कमबॅक करणाऱ्या जैसवलाचा जलवा; रॉयल्सकडून किंग्जचा पराभव| ipl 2022 Punjab Kings vs Rajasthan Royals | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Punjab Kings vs Rajasthan Royals

PBKS vs RR : कमबॅक करणाऱ्या जैसवलाचा जलवा; रॉयल्सकडून किंग्जचा पराभव

IPL 2022: राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचे 190 धावांचे आव्हान 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. राजस्थान आता 14 गुण घेऊन प्ले ऑफच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याला देवदत्त पडिक्कलने 31 तर शिमरॉन हेटमायरने 15 चेंडूत 31 धावा करत चांगली साथ दिली. राजस्थानकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या. पंजाबकडून जॉन बेअरस्टोने सर्वाधिक 56 धावा केल्या.

पाहा हायलाईट्स

हेटमायरचा षटकार आणि राजस्थानचा रॉयल विजय 

पडिक्कल बाद झाल्यानंतर हेटमारयने राजस्थानच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने चहर टाकत असलेल्या शेवटच्या षटकात षटकार मारत सामना खिशात टाकला. त्याने 15 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तर पडिक्कलने सावध फलंदाजी करत 32 चेंडूत 31 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

हेटमायर-पडिक्कलची महत्वपूर्ण भागीदारी

141-3 : अर्शदीपने जैसवालचा अडसर केला दूर

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने 41 चेंडूत 68 धावा चोपून सामन्याचे पारडे राजस्थानकडे झुकवले. मात्र 15 व्या षटकात अर्शदीपने त्याला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.

यशस्वी जौसवालचे झुंजार अर्धशतक

बटलर आणि संजू सॅमसन हे आक्रमक फलंदाज लवकर माघारी गेल्यानंतर सलामीवीर यशस्वी जैसवालने चांगली झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे राजस्थानने शतकी मजल मारली.

85-2 : सॅमसनने केली निराशा

बटलर बाद झाल्यानंतर आक्रमक फलंदाजी करत असलेल्या संजू सॅमसनला ऋषी धवनने 23 धावांवर बाद केले.

46-1 : रबाडाने मोठा मासा लावला गळाला

राजस्थानला आक्रमक सुरूवात करून देणाऱ्या जॉस बटलरला कसिगो रबाडाने 30 धावांवर बाद केले.

जितेश शर्माची फटकेबाजी

पंजाबचा जितेश शर्माने 18 चेंडूत नाबाद 38 धावा करत संघाला 189 धावांपर्यंत मजल मारून दिली.

169-5 : आक्रमक लिव्हिंगस्टोन बाद 

पंजाबचा खतरनाक फलंदाज लिम लिव्हिंगस्टोनला प्रसिद्ध कृष्णाने 22 धावांवर बाद करत पंजाबला मोक्याच्या क्षणी मोठा धक्का दिला.

119-4 : मयांक पाठोपाठ बेअरस्टो देखील परतला

युझवेंद्र चहनले 15 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मयांक आणि चौथ्या चेंडूवर 56 धावा करणाऱ्या बेअरस्टोला बाद केले.

118-3 : चहलने मयांकचीही केली शिकार

युझवेंद्र चहलच्या फिरकीत पंजाबचे एका पाठोपाठ एक फलंदाज अडकत आहेत. चहलने आता मयांक अग्रवालला 15 धावांवर बाद करत पंजाबला तिसरा धक्का दिला.

जॉनी बेअरस्टोचे झुंजार अर्धशतक

89-2 : चहलने उडवला भानुका राजपक्षेचा त्रिफळा

युझवेंद्र चहलने भानुका राजपक्षेचा 27 धावावर त्रिफळा उडवला.

47-1: पंजाबला पहिला धक्का

पंजाबचा सलामीवीर शिखर धवन 12 धावा करून बाद

  • पंजाब किंग्स प्लेइंग इलेवन

    जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषि धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह और संदीप शर्मा

  • राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेवन

    जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल और कुलदीप सेन