
RCB vs RR : राजस्थान आरसीबीला नमवून पोहचला फायनलमध्ये
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. या शतकाबरोबरच जॉस बटलरने विराट कोहलीच्या दोन विक्रमांशी बरोबरी केली. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी फायनल सामना होईल.
Highlights
148-3 : पडिक्कल बाद, राजस्थानला तिसरा धक्का
जॉस हेजलवूडने देवदत्त पडिक्कलला 9 धावांवर बाद करत राजस्थानला तिसरा धक्का दिला.
113-2 : हसरंगाने केली सॅमसन शिकार
बटलर आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली. मात्र हसरंगाने सॅमसनला 23 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
जॉस बटलरचे दमदार अर्धशतक
सलामीवीर जॉस बटलरने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत 24 चेंडूत अर्धशतक झळकावले.
61-1 : राजस्थानला पहिला धक्का
राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालला जॉस हेजवलवूडने 21 धावांवर बाद केले.
154-8 : हर्षल पटेल बाद, आरसीबीचे 20 षटकात 157 धावा
146-7 : प्रसिद्ध कृष्णाने आरसीबीला दिला मोठा धक्का
प्रसिद्ध कृष्णाने आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिकला 6 धावांवर बाद करत सहावा धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हसरंगाचा त्रिफळा उडवत सातवा धक्का दिला.
141-5 : महिपाल लोमरोर बाद
ऑबे मॅकॉयने महिपाल लोमरोरला 8 धावांवर बाद करत आरसीबीला पाचवा धक्का दिला.
पाटीदारचे दमदार अर्धशतक; मात्र अश्विनने केली शिकार
एका बाजूने एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना रजत पाटीदारने झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकले. मात्र अर्धशतकानंतर आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात पाटीदार अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 42 चेंडूत 58 धावा केल्या.
111-3 : ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात माघारी
ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र बोल्टने ग्लेन मॅक्सवेलला 24 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
79-2 : मॅकॉयने आरसीबीला दिला मोठा धक्का
दुसऱ्या विकेटसाठी रजत पाटीदार बरोबर 70 धावांची भागीदारी रचणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसला आर. मॅकॉयने 25 धावांवर बाद केले.
रजत पाटीदार - फाफ ड्युप्लेसिसने सावरले
विराट कोहली स्वस्तात माघारी गेल्यानंतर आरसीबीचा डाव रजत पाटीदार आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
आरसीबीला मोठा धक्का
रॉयल चॅलेंजर बेंगलोरला प्रसिद्ध कृष्णाने मोठा धक्का दिला. त्याने आरसीबीचा अव्वल फलंदाज विराट कोहलीला 7 धावांवर बाद केले.
संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली
आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
Web Title: Ipl 2022 Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Qualifier 2 Live Cricket Score Highlights
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..