VIDEO : मॅच जिंकूनही RCB ट्रोल; नेमकं काय झालं बघाच

IPL 2022 KKR vs RCB News, RCB latest News, IPL 2022 RCB trolled news
IPL 2022 KKR vs RCB News, RCB latest News, IPL 2022 RCB trolled newsSakal

नवी मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात फाफ ड्युप्लेसीसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bangalore) आयपीएल स्पर्धेतील (Indian Premier League) पहिला विजय नोंदवला. पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अवघ्या 128 धावांत ऑल आउट झाला होता. त्यांना निर्धारित 20 षटकेही खेळता आली नाहीत. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 3 विकेट्स मिळवला. दमदार गोलंदाजी आणि त्यानंतर धावांचा पाठलाग उत्तमरित्या केल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ ट्रोल होत आहे. कोलकाता विरुद्ध घेतलेल्या DRS मुळे नेटकरी आरसीबीला ट्रोल करत आहेत. (IPL 2022 RCB trolled on social media DRS for LBW against KKRs Varun Chakaravarthy)

कोलकाताच्या डावातील 16 व्या षटकात KKR कडून वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) फलंदाजी करत होता. बंगळुरुच्या ताफ्यातील हर्षल पटेलनं (Harshal Patel) त्याच्याविरुद्ध पायचितची अपील केली. मैदानातील अंपायरने नॉट आउट दिल्यानंतर त्याने आपला कर्णधार फाफ ड्युप्लेसीसला रिव्ह्यूसाठी मनवले. त्याच्यावर भरवसा ठेवून फाफ ड्युप्लेसीसनं (Faf du Plessis) रिह्व्यू घेतला. पण रिप्लायमध्ये चेंडू सरळ सरळ बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले. रिव्ह्यू घेण्यावरुन आरसीबीला नेटकरी ट्रोल करत आहेत. (RCB latest news)

IPL 2022 KKR vs RCB News, RCB latest News, IPL 2022 RCB trolled news
Photos: पैसा बोलता है! भरल्या खिशावर 'या' खेळाडूंचे IPLमध्ये झाले 'मनोमीलन'

एका नेटकऱ्याने आरसीबीला DRS किंग संबोधत त्यांची शाळा घेतलीय. याशिवायही अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. दुसऱ्या एका नेटकऱ्याने या निर्णयाने बंगळुरुचा संघ बांगलादेशच्या पक्तींत जाऊन बसल्याचे म्हटले आहे. DRS घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण बंगळुरु बंगळुरु आहे, असे म्हणत एकाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची शाळा घेतली आहे.

IPL 2022 KKR vs RCB News, RCB latest News, IPL 2022 RCB trolled news
RCB vs KKR : दिनेश कार्तिकला जीवनदान अन् आरसीबीचा रडतखडत पहिला विजय

श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिडु हसरंगा यांनं कोलकातासाठी जाळं विणलं. आपल्या चार षटकांच्या कोट्यात त्याने 20 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. आकाशदीपनं तीन विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. परिणामी कोलकाताचा डाव अवघ्या 128 धावांत आटोपला.

कोलकाता नाईट रायडर्सकडून गोलंदाजीत टीम साउदी तीन आणि उमेश यादव यांनी दोन विकेट घेत बंगळुरुला सुरुवातीला अडचणीत आणले. पण शर्फन रुदरफोर्ड 28 (40), शहाबाज अहमद 27 (20) आणि दिनेश कार्तिकने 7 चेंडूत केलेल्या 14 धावांच्या खेळीन कोलकाताच्या प्रयत्नावर पाणी फेरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com