
IPL 2022 : रोहितची 'जादू की झप्पी' पण, सुरक्षित अंतर ठेवून (VIDEO)
IPL 2022 MI vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने शनिवारी मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 18 व्या सामन्यात गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर अनुज रावतच्या 66 धावांच्या समंजस खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला. चार सामन्यांत मुंबईचा हा सलग चौथा पराभव आहे. आरसीबीला चार सामन्यांत तिसरा विजय मिळाला आहे. सूर्यकुमार यादवच्या 37 चेंडूत नाबाद 68 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 6 बाद 151 धावा केल्या पण आरसीबीने हे लक्ष्य 18.3 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. आरसीबीच्या अनुज रावतने 66 धावांची खेळी करत सामनावीर ठरला.(Virat Kohli Rohit Sharma Fan News)
कोहलीचे या सामन्यात अर्धशतक हुकले 48 धावा करून तो डेवाल्ड ब्रेविसच्या चेंडूचा पहिला बळी ठरला. कोहलीला जरी अर्धशतक ठोकता आले नसले तरी पण सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्याने चाहत्यांची मने जिंकली. कोहली आणि रोहितची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत आरसीबीच्या खेळीदरम्यान एका चाहत्याने सुरक्षा तोडून मैदानात प्रवेश केला.
आरसीबीच्या डावाच्या 13व्या षटकात ही घटना घडली. जेव्हा कोहली फलंदाजी करत होता. एक चाहता मैदानावर आला आणि त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितला जाऊन मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण कोरोनाचे नियम पाहून रोहित त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आले आणि चाहत्यांला बाहेर काढले. मात्र त्यानंतर रोहितने हात वर करून फॅनला 'एअर हग' देऊन चाहत्यांना खूश केले. त्याचवेळी रोहितचे हे हावभाव पाहून कोहलीलाही खूप आनंद झाला. त्याने दोन्ही हाताने हृदयाच्या आकारात बनवून रोहितच्या कृतीचे कौतुक केले. कोहली आणि रोहितच्या या हावभावाचे सोशल मीडियावर चाहते कौतुक करत आहेत.
मुंबई इंडियन्सचाया हंगामात चौथा पराभव झाला आहे. त्यामुळे आता पॉइंट टेबलमध्ये मुंबईचे स्थान विस्कळीत झाले आहे. मुंबई 9व्या स्थानावर पोहोचली आहे, तर बंगळुरूने तिसर्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे.
Web Title: Ipl 2022 Rcb Vs Mi Virat Kohli Loves Rohit Sharma Fan Get Ground Tried Get Hug From Rohit And Virat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..